अभिनेता सोहेल खानचा पत्नी सीमाला घटस्फोट; २४ वर्षांपुर्वी पळून जाऊन केले होते लग्न

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानने पत्नी सीमा खानपासून घटस्फोट घेतला आहे. दोघेही आज (१३ मे) फॅमिली कोर्टाबाहेर दिसून आले. लग्नाच्या २४ वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात येत आहे. दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. असे सांगितले जात आहे की दोघेही बरेच दिवस वेगळे राहत होते.(sahil khan seema sachdev divorce in court)

घटस्फोटासाठी सोहेल खान आणि सीमा सचदेव फॅमिली कोर्टात दाखल झाले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही बातमी बॉलिवूड आणि खान कुटुंबासाठी धक्कादायक आहे. सोहेल खान हा सलमान खानचा सख्खा भाऊ आहे.

सोहेल आणि सीमा यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. सीमा ही दिल्लीची रहिवासी आहे. फॅशन जगतात नाव कमवण्यासाठी ती आली होती. रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट चंकी पांडेच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये झाली होती. सोहेल पहिल्या नजरेतच सीमाच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांचे प्रेम खूप घट्ट झाले.

धर्म वेगळा असल्यामुळे सोहेल आणि सीमा यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. यामुळे मध्यरात्री मौलवीचे अपहरण करण्यात आले आणि रात्रीच लग्न झाले. दोघांनी आर्य समाज मंदिरात दुसरे लग्न केले.

सीमाचे आई-वडील लग्नाच्या विरोधात होते. सीमाच्या आई-वडिलांचा या लग्नाला विरोध होता. धर्म वेगळा असल्यामुळे दोघांनी लग्न करावे असे त्यांना वाटत नव्हते. मात्र, या जोडप्याने कोणाचेही न ऐकता एकमेकांसोबत लग्न केले.

खान कुटुंबात आधीच एक घटस्फोट झाला आहे. अरबाज़ खानची बायको मलाईका अरोरा खानने नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. तिने अभिनेता अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे आधीत कबूल केले आहे. सलमान खानचे तर लग्नच झाले नाही.

महत्वाच्या बातम्या :-
पुणेकरांनो सावधान! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ; वाचा नेमकं घडलं काय?
हेमा मालिनीला सोडून शबाना आजमीसोबत रोमँटिक अंदाजात दिसले धर्मेंद्र, वाचा काय आहे प्रकरण
मानुषी छिल्लरने पहिल्याच चित्रपटात घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, संजूबाबानेही केली मोठी कमाई