बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawajuddin Siddiqui) मुंबईच्या लोकल (Mumbai Local) ट्रेनमधून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. चित्रीकरणाला पोहोचण्यासाठी उशीर होऊ नये, यासाठी तो लोकलने प्रवास केला होता. त्यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचा लोकलमधून प्रवास करतानाचा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदवीर अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) याचा.
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे सागर कारंडे घराघरात पोहोचला. या शोद्वारे रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवत सागर त्यांची दुःख विसरायला लावतो. आपल्या कॉमिक टायमिंगद्वारे तो प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करतो. तर सागर एक विनोदवीर असण्यासोबतच एक उत्तम अभिनेतासुद्धा आहे. त्याला अभिनयाची आवड असल्याने तो वेळ काढून नाटकातही काम करत असतो.
सध्या सागर ‘चला हवा येऊ द्या’ या शोसोबत ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात काम करत आहे. तर नुकतीच या नाटकाचा प्रयोग मुंबईच्या उपनगरात होता. तर नाटकाच्या प्रयोगासाठी वेळेत पोहोचण्यासाठी त्याने मुंबई लोकलचा मार्ग अवलंबला. लोकल ट्रेनमधील गर्दीत धक्के खात त्याने हा प्रवास केला. यादरम्यानचा एक फोटो सागरने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला.
सागरने लोकल ट्रेनमधील फोटो शेअर करत लिहिले की, ‘नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास’. सागरने हा फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. तर अनेकांनी त्याच्या या साधेपणाचे कौतुक केले.
‘चला हवा येऊ द्या’ या शोने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनी या शोला डोक्यावर घेतले आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. आपल्या विनोदाद्वारे ते रसिक प्रेक्षकांना ते पोटधरुन हसवतात. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सागर ‘चला हवा येऊ द्या’ हा शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळाली होती. पण त्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडेने यावर सविस्तर भाष्य केले होते. त्याने सांगितले होते की, या वृत्तात अजिबात तथ्य नाही. कारण नाटकांचे प्रयोग हे फक्त शनिवारी आणि रविवारी असतात. ‘चला हवा येऊ द्या’चे शूटिंग सोमवारी, मंगळवारी असते. त्यामुळे मी नाटकातही काम करतो आहे आणि चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील.’
महत्त्वाच्या बातम्या :
‘हे कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसे घेऊन जातात’; सिद्धार्थ जाधवला फिल्मफेअर भेटल्यानंतर कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा
स्वतःची कथा पडद्यावर पाहून प्रवीण तांबे झाले भावूक; म्हणाले, ‘स्वप्न पाहा, एकदिवस ते नक्की पूर्ण होतात’
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..