Share

सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? सागर कारंडे स्वत:च खुलासा करत म्हणाला..

sagar karande

‘झी मराठी’वरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतले आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो.

रसिकांना ते पोटधरुन हसवतात. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. याचबरोबर कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

तसेच या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता सागर कारंडेने देखील आपल्याला चांगलेच वेड लावले आहे. मात्र काही दिवसांपासून सागर कारंडे (Sagar Karande) याने ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सोडतोय हे कळल्यावर त्याचा चाहता वर्ग नाराज झाला आहे. मात्र या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडे याने यावर सविस्तर भाष्य केले आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले की, या वृत्तात अजिबात तथ्य नाही. कारण नाटकांचे प्रयोग हे फक्त शनिवारी आणि रविवारी असतात. चला हवा येऊ द्याचे शूटिंग सोमवारी, मंगळवारी असते. सोमवार आणि मंगळवारी कोणत्याच नाटकाचे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे मी नाटकातही काम करतो आहे आणि चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील.’

दरम्यान, सोशल मिडियावर काही दिवसांपासून सागर कारंडेने शो सोडल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर त्याने यावर स्पष्टीकरण देऊन याबाबत खुलासा केला आहे. सागर कारंडे सध्या चला हवा येऊ द्या या शो व्यतिरिक्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि ‘इशारो इशारो में’ या नाटकात काम करताना दिसतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हिजाब वादात आता अभिनेत्री सोनम कपूरची उडी, म्हणाली, शीख तरूण पगडी घालू शकतात मग..
अघोरी कृत्य! गर्भवती महिलेच्या डोक्यात ठोकला 2 इंचाचा खिळा, कारण वाचून तुमची उडेल झोप
बाबो! मोदींच्या एका तासाच्या विमान प्रवासासाठी खर्च होतात ‘इतके’ कोटी रुपये, वाचून थक्क व्हाल
”तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?”

इतर ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now