Share

“मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल महत्वाची”

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेची गेल्या १० दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. कल संध्याकाळी झालेल्या या सभेत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच भुजबळ आणि मिटकरींवर देखील  तीव्र शब्दांत  निशाणा  साधला आहे.

काय म्हणाले प्रकाश महाजन
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल ही महत्त्वाची आहे
, अशा शब्दांत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

एक जोडपं मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला आलं तेव्हा मुख्यमंत्री घर सोडून पळून गेले. मातोश्रीच्या रक्षणासाठी एका म्हातारीला आणून बसवले. उद्धव ठाकरे यांचं सगळ्या गावाशी जमतं पण भावाशी जमत नाही, असा टोलाही प्रकाश महाजन यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले, 
महाबळेश्वरच्या सभेत उद्धव ठाकरे यांना भरलं ताट दिलं, त्यांनी तुला नेता हो म्हटलं,  तरीही तुम्ही या भावाची मर्जी राखली नाहीत, यावरून उद्धव ठाकरे हे किती कोणत्या मनाचे आहेत , हे दिसून येते , असे प्रकाश महाजन यांनी म्हटले .

‘राज ठारेंकच्या तलवारीला हात घालण्याअगोदर तुम्हाला प्रकाश महाजन नावाचं म्यान तुम्हाला दूर करावं लागेल, असं ही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी भोंग्याविषयी भूमिका घेतली. ते काही चूक नाही. त्यांनी सांगितलं आहे की, हा केवळ धार्मिक  विषय नाही तर, सामाजिक विषय सुद्धा  आहे.’

हनुमान चालीसा पठणावरून प्रकाश महाजन यांनी अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांना खडेबोल सुनावले म्हणाले,
संत ज्ञानेश्वरांनी चार पायांच्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते मात्र, राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राज्यातील दोन पायांचे सर्व रेडे हनुमान चालीसा म्हणायला लागले आहेत, अशी खोचक टिप्पणी प्रकाश महाजन यांनी केली.

‘जी अजान होते त्या अजानचा नेमका अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की, त्या अल्लाहशिवाय कुणी श्रेष्ठ नाही, म्हणून अल्लाहची प्रार्थना करा. आम्ही का ऐकायची ती प्रार्थना.. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करा.’ असं म्हणत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीच पण यावेळी अजानबाबत देखील त्यांनी थेट आक्षेप देखील घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
कडवं हिंदुत्व म्हणत राज ठाकरेंच्या शनिवारच्या मांसाहारावरून मिटकरींचा टोला, म्हणाले, राजसाहेब.. 
राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लिम समाज आक्रमक; इम्तियाज जलील यांनी केले ‘हे’ मोठे विधान
हिंदू- मुस्लिम नावाने फूट पाडणाऱ्या राजकीय नेत्यांना ‘या’ घटनेमुळे मिळाली मोठी चपराक
भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलत असतानाच अजान झाली सुरू, भडकलेले राज म्हणाले, “आत्ताच्या आत्ता…”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now