सदावर्ते कधीच मेंटेनन्स भरत नाहीत उलट दादागिरी करतात, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिलेने केली पोलखोल

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला, तेव्हापासून महाराष्ट्र राजकारणात अँड गुणरत्न सदावर्ते यांचं नाव प्रचंड चर्चेत येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना भडकावल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटकही करण्यात आली आहे. आता सदावर्तेंमुळे त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती समोर येत आहे.

शरद पवारांच्या हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.कामगारांमध्ये हस्तक्षेप करुन एसटी कर्मचार्‍यांच्या भावना भडकवून भाषणे केलीत. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करुन संकट निर्माण केले.यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

त्यातच आता सदावर्ते राहत असलेल्या बिल्डिंगच्या रहिवाशांनी देखील त्यांची आणि त्यांच्या पत्नी अँड जयश्री पाटील यांच्याविषयी तक्रार केली आहे. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्याबद्दल वृत्तवाहिनीशी बोलताना सदावर्ते यांच्या काही गोष्टींचा खुलासा केला. महिलेचे नाव डॉ.प्रियांका शेट्ये आहे.

म्हणाल्या, सदावर्ते हे कधीच बिल्डिंगचा मेंटेनन्स भरत नाहीत. विचारले तर दादागिरी करतात. बिल्डिंगमध्ये राहणारे सगळेच सदावर्ते आणि त्यांच्या बायकोला कंटाळले आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस तक्रार देण्यासाठी गेले पण माझी तक्रार घेतली गेली नाही, अशी महिला म्हणाली.

तसेच म्हणाल्या, आधीच बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जागा कमी आहे, मात्र सदावर्ते यांच्या अनेक गाड्या इथे लावलेल्या असतात. त्यांचा त्रास गेल्या एक वर्षांपासून सर्वच रहिवाशांना होत आहे. काही दिवसांपूर्वी रोज सदावर्ते यांच्या घरी वीस पेक्षा अधिक लोक यायचे, बिल्डिंग खाली कित्येक वेळा उभा असायचे. मात्र ते कोण होते याबद्दल माहिती नसल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच बिल्डिंगच्या लिफ्टमधून हे लोक ये-जा करत असताना, त्यातील काहीजण धक्का देत असायचे, किंवा एकटक पाहत राहायचे. त्या लोकांबद्दल अँड जयश्री पाटील यांच्याकडे तक्रार केली असता, त्या उलट मलाच भांडू लागल्या. एसटी कर्मचारी असे करू शकत नाहीत असे म्हणाल्या. शिवाय अंगावर देखील धावून आल्या असे रहिवाशी प्रियांका यांनी माध्यमाला सांगितले.