Share

“पवारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान असेल, तर पवारांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी”

ajit pawar

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अशात ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी भाषण देत लोकांना संबोधित केलं.

पण मोदींची देहू भेट एका वेगळ्याच कारणामुळे सर्वात जास्त चर्चेत आली आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न देणे. या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांचे भाषण झाले, पण अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नाही. अजित पवार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित झाले होते.

तसेच या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यात फडणवीसांनी भाषण केले होते. अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूलाच बसलेले होते. तर दुसऱ्या बाजूला फडणवीस बसलेले होते. यावेळी सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं.

त्यानंतर सुत्रसंचालकांनी थेट मोदींचे नाव घेतले. त्यामुळे मोदी भाषणाला गेले. अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नसल्यामुळे राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि नेते अमोल मिटकरी यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, यावर आता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुप्रिया सुळे यांनी `तो` शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही. प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“तीर्थक्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, हा महाराष्ट्राचा अपमान कसा होतो?”, असा सवाल करीत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेतेसदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

दरम्यान, “पवारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांच्या मालकीची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी.”, असा खोचक सल्ला देखील खोत यांनी दिला. नुकताच देहू येथे पार पडलेला कार्यक्रम सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या
राज्य सरकार अयोध्येमध्ये भव्य ‘महाराष्ट्र सदन’ बांधणार; आदित्य ठाकरेंनी केली घोषणा
नुपूरला काही झालं तर…, हातात मशाल आणि भगवा झेंडा घेऊन रात्रभर फिरत होते हिंदू तरुण
प्रकाश आमटेंच्या प्रकृतीबाबत मुलाने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला, बाबांची प्रकृती आज…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now