राजकीय वातावरण तापलेले असतानाच आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. “पवारांचं आडनाव बदलून आगलावे करावं”, असं सदाभाऊंनी म्हटलं आहे.
सदाभाऊ सोलापूर दौऱ्यावर असून यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना खोत म्हणाले, ‘पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे.’
तसेच पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, ‘पवारांचे सर्व आयुष्य लावण्यामध्येच गेलं असल्याने त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. हे राज्य होरपळून निघालं असून आता थांबलं पाहिजे,” अशी सणसणीत टीका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केली आहे.
सदभाऊंनी सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना पवारांवर ही जहरी टीका केली आहे. ईडीच्या धाडी येड्यांवर पडत आहेत. सज्जनांना ईडीचा काहीही त्रास नाही, असंही सदाभाऊंनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान खोत यांच्या या विधानाने राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत. तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं, असे मिटकरी यांनी म्हंटले आहे.
तसेच भाजपापासून राज्याला धोके निर्माण झाले असून आग कोण लावत आहे हे सर्वांना माहिती असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. सदाभाऊंच्या बोलण्याला पक्षात काही महत्व नाही. पुढील आमदारकी भेटावी यासाठी त्यांची ही धडपड असल्याचे देखील मिटकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या मंत्र्यांवर ठाकरे सरकारची कठोर कारवाई, पोलिसांनी घेतली ही ऍक्शन
नातेवाईक पाठलाग करत असल्याचे पाहताच प्रेमीयुगुलाने उचलले धक्कादायक पाऊल, झाला भयानक शेवट
विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासा; ठाकरे सरकार कोरोनाकाळात दाखल झालेले सर्व गुन्हे घेणार मागे
कोरोना कॉलरट्युनपासून मिळणार सुटका, ‘या’ कारणामुळे सरकारने दिले बंद करण्याचे आदेश