राज्यातील वातावरण तापलेलं चांगलच तापलं आहे. भोंग्यावरून राज्यात गदारोळ पाहायला मिळत आहे. आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. असं असतानाच आता आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली. यामुळे आता पुन्हा एकदा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
अजित पवारांवर टीका करताना खोत यांची जीभ घसरली. ‘टीव्ही लावला तर सरकारचा भ्रष्टाचार, मंत्र्यांचा भ्रष्टाचार याशिवाय बातम्या दिसत नाहीत. पैसे खाण्याची सवय लागल्यामुळे एकापेक्षा एक वरचढ मंत्री भ्रष्टाचार करत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार खोत यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत येवला येथे शेतकरी संवाद दौर्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ‘नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्याला पन्नास हजार रुपयांची सूट देऊ, शेतकर्याला मोफत वीज देऊ, सातबारा कोरा करू, नाही झाले तर पवाराची अवलाद नाही, अशी घोषणा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी केली होती, याची आठवण खोत यांनी करून दिली.
पुढे यावर बोलताना खोत म्हणाले, ‘आता अजित पवार उपमुख्यमंत्रिपदावर आहेत. तरी एकाही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता पवार कोणाची अवलाद आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत खोत यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली.
दरम्यान, ‘कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाहीये. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे, असा खळबळजनक आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
‘राज्य सरकारने कष्टकरी वर्गाची चेष्टा सुरू केली आहे. दूध, कांदा प्रश्न गंभीर झाला आहे याकडे सरकार लक्ष देत नाहीये. सरकार विरोधात जे बोलेल त्यांना गुन्हे दाखल करण्याचा काम सुरू आहे. सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता. तुम्ही काय औरंगजेबचे औलाद आहात का?, असा सवाल उपस्थित करत थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या
नवनीत राणा-मुख्यमंत्र्यांच्या वादात अब्दुल सत्तारांची उडी; राणांना ओपन चॅलेंज देत म्हणाले…
मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं नवनीत राणांना पडणार महागात, पुन्हा जावं लागणार तुरुंगात?
स्वत:ला खूप हुशार मानत असाल ‘या’ फोटोतील हरीण शोधून दाखवा? ९९% लोकं झालेत फेल
चुकूनही घरच्यांसमोर बघू नका ‘ही’ वेब सिरीज, बोल्डनेस आणि इंटिमेट सीन्सने हद्द केलीये पार