Share

‘छत्री असूनही पावसात भिजणे आणि खुर्ची असूनही उभं राहणे याला दांभिकपणा म्हणतात’

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील मेट्रो ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशासारखे दिसले. मेट्रोच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर ते पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी आपल्या काही समर्थकांसह ट्रेनमध्ये अंदाजे 6 किलोमीटरचा प्रवास केला. विशेष म्हणजे पवारांनी स्वत: सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहून तिकीट खरेदी केले. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आहे.

तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाचे प्रेझेंटेशन पाहिले. अधिकाऱ्यांनी वेळापत्रकाच्या अगोदर ती कशी तयार केली, त्याच्या बांधकामादरम्यान कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले, हे सांगितले, एवढेच नाही तर पवार यांनी प्रेझेंटेशन द्वारे मेट्रोच्या बांधकामाचे तंत्रज्ञानही समजून घेतले.

तिकिट खिडकीवर जाऊन पवारांनी तिकीट घेतले. फुगेवाडी ते संत तुकारामनगर स्थानक असा प्रवासही त्यांनी केला. त्यानंतर झालेल्या बैठकीत पवारांसमोर मेट्रोचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी पवारांनी काही सूचनाही केल्या. दोन तासाच्या या दौऱ्यात पवारांनी पिंपरी-चिंचवडविषयीच्या गतस्मृतींना उजाळा दिला.

पवारांचा दौरा पूर्ण होताच भाजपने थयथयाट सुरू केला. भाजप प्रदेशाध्य चंद्रकात पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर टीका करतानाच मेट्रोविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले. भाजपला मेट्रोकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याचाच धागा पकडत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही ‘छत्री असूनही पावसात भिजणे आणि खुर्ची असूनही उभं राहणे याला खरेपणा नाही तर दांभिकपणा म्हणतात’ असे ट्वीट करत पवारांना चांगलाच टोला लगावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर मेट्रोने प्रवास केल्याबद्दल टीका केली.

पाटील म्हणाले की, मेट्रोचा इतका घाईघाईने प्रवास हे दर्शविते की राष्ट्रवादीचे अध्यक्ष केंद्राच्या प्रकल्पाचे श्रेय घेऊ इच्छित आहेत.11,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पापैकी 8,000 कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होते, मात्र कोविडमुळे त्यांनी ते पुढे ढकलले. आता कोविडचे नियम मोडून पवार साहेब असा प्रवास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सपाला जबर धक्का; मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश
शुल्लक फायद्यासाठी तीन मायलेकींनी ४२ लेकरांचा केला खुन, वाचा महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटनेबद्दल..
सिनेसृष्टीत खळबळ; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याच्या कडेला गोणीत सापडला मृतदेह
शरद पवार यांना पाहताच बहिणीला अश्रू अनावर; भावाबहिनीमधील प्रेम पाहून कार्यकर्ते गेले गलबलून….

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now