Share

प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?

sada saravankar

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या अडचणींमद्धे वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सदा सरवणकर, समाधान सरणवकर, संतोष तेलवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच आर्म्स ऍक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे. प्रशनिवारी भादेवी येथे शिंदे गट आणि शिवसेनेच्या झालेल्या वादात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला असल्याचा खळबळजनकआरोप करण्यात आला आहे.

याच प्रकरणी आता दादर पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त आलं आहे. घटनास्थळावरुन बंदुकीची गोळीही जप्त करण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर पोलिसांनी सदा सरवणकर यांची कसून चौकशी केली. सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला असा आरोप आमदार सुनील शिंदेंनी केला होता.

मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहे. याचबरोबर शनिवारी रात्री पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान, सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील दोन गटांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. असं असतानाच प्रभादेवीतील राड्यामुळे या दोन्ही गटातील वाद आणखीनच चिघळलेला दिला.

दरम्यान, शनिवारी गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकीय वातावरण देखील तापलं आहे. याच मुद्यावरून राजकीय दावे – प्रतिदावे देखील पहायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now