Share

सचिनची मुलगी सारा तेंडूलकर ‘या’ विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात झालीय पागल; स्वत:च दिली कबुली

सचिन तेंडुलकरसोबत त्याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मिडीयावर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. साराने मॉडलिंग विश्वात पदार्पण केल्यामुळे तिचे कौतुक सर्वजणच करताना दिसतात. सारा सोशल मिडीयावर ॲक्टीव असणाऱ्या लोकांपैकी एक आहे. त्यामुळे तिच्याविषयीची कोणतीच गोष्ट चर्चेत आल्याशिवाय राहत नाही.

सध्या अशाच एका कारणासाठी सारा मिडीयावर चर्चेचे कारण ठरली आहे. एका मुलाखतीदरम्यान साराने आपल्याला नक्की कोणता बॉलिवूड अभिनेता आवडतो याविषयी खुलासा केला आहे. या अभिनेत्यासाठी ती वेडी असल्याचे देखील तिने मुलाखतीत सांगितले आहे.

आवडत्या अभिनेत्याचे नाव सांगत साराने यावेळी म्हटले आहे की, मला रणवीरचा अभिनय आणि त्याची बॉडी लॅग्वेज, त्याची स्टाईल खूप आवडते. सारा तेंडुलकर पुढे म्हणाली की, मी रणवीरची खूप मोठी फॅन आहे, ज्यामुळे त्याचा कोणताही सिनेमा आला तरी मी त्याला पाहायला पहिल्याच दिवशी सिनेमागृहात जाते.

साराने दिलेल्या उत्तरातून तिचे रणवीर सिंगवर किती प्रेम आहे हे दिसून येत आहे. साराने रणवीरसोबत एक फोटो ही काढला आहे. ज्यात ती खूपच आनंदी आणि सुंदर दिसत आहे. सारा रणवीरची फॅन असल्यामुळे तिने एकही चित्रपट रणवीरचा पाहिचा सोडला नाहीये.

दरम्यान सारा तेंडुलकरच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील अभिनेत्रीही फिक्या आहेत. सारा मॉडेलिंग करत असल्यामुळे ती सतत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे लेटेस्ट हॉट आणि बोल्ड फोटो टाकत असते. तिच्या या फोटोंवर नेटकरी भरभरुन प्रतिक्रिया देताना दिसतात.

मध्यंतरी सारा बॉलिवूड विश्वात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व अफवा असल्याची माहिती सचिन तेंडुलकरने दिली होती. यावेळी माझी मुलगी बॉलिवूड विश्वात पदार्पण करणार नसल्याचे सचिनने सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या
सचिनची मुलगी सारा तेंडूलकर ‘या’ विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात झालीय पागल; स्वत:च दिली कबुली
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकदाराला किती टॅक्स कधी भरावा लागतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती
“माझी हत्या करण्याचा कट, घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं”
संजय दत्तची ‘ती’ धमकी अन् संजय नार्वेकराला मिळायला लागली सेटवर खुर्ची; वाचा नक्की काय घडलं होतं

ताज्या बातम्या खेळ बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now