Sachin Tendulkar : T20 विश्वचषकाचे सराव सामने चालू आहेत. त्यामध्ये सुपर-12 फेरीपूर्वी भारतीय क्रिकेट संघ सराव सामना खेळत आहे. इंडिया टीमने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने 23 ऑक्टोबरला आपल्या वर्ल्डकपच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यामध्ये, चांगल्या फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने टी-20 विश्वचषकासाठी एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे.
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणते चार संघ सेमीफायनल फेरीत पोहचतील याबाबत सचिन तेंडुलकरने एक अंदाज लावला आहे. तसेच सचिन तेंडुलकरने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत आपले मत मांडले आहे. तसेच सचिनने आपला आवडता संघ कोणता हेही सांगितलं आहे.
सचिन तेंडुलकरने टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सांगितले की, ‘भारत हा माझा आवडता संघ आहे. होय, मी भारतासोबत आहे आणि भारताने जिंकावे अशी माझी मनातून इच्छा आहे. केवळ मी भारतीय आहे म्हणून नाही मी हे म्हणत नाही तर कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची क्षमता आमच्यात आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
सचिन म्हणाला पुढे म्हणाला की, ‘मला साहजिकच वाटते की भारताने चॅम्पियन बनावे. तसेच माझ्यासाठी सेमीफायनल फेरीत पोहोचणारे टॉप-4 संघ भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आहेत. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे न्यूझीलंडही चांगली कामगिरी करू शकतो. भारताला खूप चांगली संधी आहे. हा संघ संतुलित आहे आणि आम्हाला बाहेर जाऊन चांगली कामगिरी करण्याची जोड आहे. खरे तर मी या संघाबद्दल खूप आशावादी आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकर हा एक चांगलाआणि महान फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक महत्वाचे सामने खेळले आहेत. तसेच अनेक सामन्यांत त्याने मोलाचे योगदान दिले आहे. शिवाय भारताने २०११ साली वर्ल्डकप जिंकला तेव्हा तो टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य होता. सचिनचे जगभरात लाखो चाहते आहेत.
महत्वाच्या बातम्या
Gaurav More : “भीमराया आमच्या श्वासावर तुमचे उपकार…”, लंडनला जाऊनही आंबेडकरांना नाही विसरला हास्यजत्रा’फेम गौरव मोरे; खास फोटो पोस्ट करत म्हणाला,
मृत्युनंतरही वैशाली ठक्करने दुसऱ्याच्या जीवनात आणला प्रकाश, कुटुंबाने शेवटची इच्छा केली पुर्ण
BJP : आली रे आली भाजपची बारी आली! आजवर शिवसेना फोडणाऱ्या भाजपचा माजी मंत्रीच ठाकरेंनी फोडला