Share

sachin tendulkar : भारताच्या पराभवानंतर सचिनने केले हैराण करणारे ट्विट; म्हणाला, जसा विजय साजरा केला तसा…

sachin tendulkar

sachin tendulkar on team india  | टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. अॅडलेडमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी १६ षटकांत पूर्ण केले.

या सामन्यानंतर अनेक खेळाडू वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी तर कर्णधार रोहित शर्मावरही संताप व्यक्त केला आहे. अशात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सुद्धा सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारतीय संघाची बाजू घेतली आहे.

सचिन तेंडुलकरने एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्याने म्हटले आहे की, आपल्याला पराभव मान्य करता आला पाहिजे. कारण जय आणि पराजय या आपल्याच हातात असतात. जसा संघाचा विजय आपण आपल्या विजयासारखा साजरा करतो, तसा पराभवही आपल्याला स्विकारता आला पाहिजे.

नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात त्याचप्रमाणे जीवनालाही दोन बाजू असतात. जर संघाचा विजय आपण आपला म्हणून साजरा करतो, तसा पराभवही आपण स्वीकारला पाहिजे. आयुष्यात पराभव आणि विजय हे दोन्ही आपल्याच हातात असतात, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ विकेट्स गमावून १६८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. हार्दिकने ३३ चेंडूत ६३ धावांची जलद खेळी खेळली. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारले.

तसेच कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात इंग्लंडने २४ चेंडू राखून लक्ष्य गाठले. जोस बटलरने ४९ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा केल्या. त्याचवेळी, अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-
गद्दारी करणाऱ्या किर्तीकरांवर उद्धव ठाकरे भडकले; घडवली जन्माची अद्दल, मुलाला मात्र..
जिगरी दोस्त गोपीनाथ मुंडेंसाठी विलासरावांनी शिवसेनेचे १३ आमदार फोडले होते
Sachin Tendulkar : पराभव-विजय हे आपल्याच हातात असतात; भारताच्या पराभवानंतर सचिनने केले हैराण करणारे ट्विट

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now