मुंबई : “माझ्या शिक्षणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या धड्याने झाली आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली” अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ‘जाणता राजा’च्या भव्य प्रयोगाला शुभेच्छा देताना ते बोलत होते.
मुंबई भाजप अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी ‘जाणता राजा’चे प्रयोग आयोजित केले आहेत. प्रयोगाची सुरुवात तुळजाभवानीच्या आरतीने होत असून पहिली आरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर यांनी हजेरी लावली. शनिवारी सचिन तेंडुलकरने आरती करून प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना सचिनने जे भाषण केले त्याने सर्वांची मने जिंकली.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानातच आपल्या क्रिकेट खेळण्याला सुरवात केली होती. शिवाजी पार्क जवळच त्यांचे घर होते. तसेच मराठी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहासही त्यांच्या शिक्षणात सुरवातीलाच होता.
कसोटी क्रिकेटचे आकर्षण टिकवून ठेवायचे असेल तर ते किती दिवस चालेल यापेक्षा तो खेळ किती रोमांचक होईल हे पाहिले पाहिजे, असे मत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या चार कसोटी मालिकेतील पहिले तीन सामने तीन दिवसांत संपले.
सचिनच्या मते वनडे क्रिकेटमध्ये कसोटी प्रमाणे दोन डाव ठेवावेत. टी-२०च्या काळात जर क्रिकेट वनडे क्रिकेट वाचवायचे असेल तर या फॉर्मेटमला २५-२५च्या चार भागात करण्याचा सल्ला दिला आहे. याचा अर्थ ती एक छोटी कसोटी मॅच होईल. जेथे प्रत्येक संघाकडे २० ऐवजी १० विकेट असतील. प्रत्येक संघ २५ षटकांचे दोन डाव खेळेल.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रेरणादायी नाटक ‘जाणता राजा’ आजपासून शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर रंगणार आहे. सर्व रसिकांना हे नाटक विनामूल्य पाहता येईल.
भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या नाटकाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची महान कलाकृती ‘जाणता राजा’ हे महानाट्या १५ मार्च ते 19 मार्चपर्यंत चालणार आहे. रोज सायंकाळी 6.45 वाजता प्रयोग सुरू होणार आहे.
या भव्य नाटकाची मोफत तिकिटे दादर येथील शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह-बोरिवली, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह-मुलुंड आणि मुंबईतील दामोदर नाट्यगृह-परळ येथे उपलब्ध आहेत. रसिकांनी आणि शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
वनडे क्रिकेट होईल ट्वेंटीपेक्षाही थरारक! सचिनने सुचवली ; जबरदस्त आयडिया, पुर्ण फॉर्मॅटच बदलून जाणार..
सारा तेंडूलकर की सारा अली खान? शुभमनच्या अफेअरचे रहस्य उलगडलं, थेट दोघांचा फोटो आला समोर
‘वयाच्या या टप्प्यात मी खूप काही…’; मुलाने शिंदेगटात प्रवेश करताच सुभाष देसाईंची धक्कादायक प्रतिक्रीया






