Subhash Desai: शिवसेना पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर आता महाराष्ट्रात काही घरा-घरांमध्ये नाती उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये विभागली आहेत. शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते ( ठाकरे गट ) सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासाठी हा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सुभाष देसाई यांची ओळख आहे. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे देसाई कुटुंबात फूट पडल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भूषण देसाई यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी ठिणगी पडली आहे.
यावर बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, माझ्या मुलगा भूषण देसाई याने शिंदे गटात प्रवेश केला ही माझ्यासाठी क्लेशदायक घटना आहे. पण शिवसेनेत किंवा राजकारणात त्याचे कोणतेही काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.
तसेच, शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी यांच्याशी मागील पाच दशकाहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच आढळ राहिली. वयाच्या या टप्प्यात मी खूप काही करण्याच्या घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे संपूर्ण न्याय मिळेलपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबत माझे कार्य सुरू ठेवणार आहे, असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले आहे.
यादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचत शिंदे यांनी भाजपाच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कोणाची? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला. यावर निवडणूक आयोगाने निर्णय देत पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला दिले. या निर्णयामुळे ठाकरे गटात प्रचंड नाराजी पसरली.
महत्वाच्या बातम्या
चिमुकल्याने लहान भावाच्या बर्थडेला केलेला जुगाड पाहून पाणावतील डोळे; भाकरीवर मेणबत्ती पेटवत…
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश; धक्कादायक कारण आले समोर