ऑस्ट्रेलियाचा(Australia) महान खेळाडू गोलंदाज शेन वॉर्नचे(Shane Warne) शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोह सामुई, थायलंड(Thailand) येथील एका व्हिलामध्ये शेन वॉर्नला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी शेन वॉर्नला मृत घोषित केले.(sachin sharjah match inning shane warne story )
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनानंतर दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील दुःख व्यक्त केले होते. वॉर्नच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी सचिन तेंडुलकरने शारजाहमध्ये खेळलेल्या ऐतिहासिक खेळीची आठवण काढली आहे. १९८८ च्या कोका-कोला कपमध्ये सचिनने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये शेन वॉर्नचा जोरदार समाचार घेतला होता.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नने सचिन आपल्याला स्वप्नातही दिसतं असल्याचे सांगितले होते. शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या कोका-कोला कपच्या सहाव्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी ४६ षटकात २७६ धावांची गरज होती. त्यावेळी सलामी फलंदाज म्हणून सचिन आणि सौरव गांगुली मैदानात उतरले होते.
या सामन्यात सचिनने सुरवातीपासून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. सचिनने विशेषतः शेन वॉर्न, कॅसप्रोविट्झ, स्टीव्ह वॉ आणि टॉम मूडी या गोलंदाजांना चांगलेच धुतले. सचिनने या सामन्यात भरपूर चौकार आणि षटकार मारले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात सचिन बेधडक फलंदाजी करत होता.
अखेर या सामन्यात भारताचा पराभव झाला. पण नेट रनरेटच्या जोरावर भारताने या मालिकेत अंतिम फेरीत धडक मारली होती. यानंतर २४ एप्रिल १९९८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये सचिनने १३४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. या सामन्याच्या दिवशीच सचिनचा २५ वा वाढदिवस होता. या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
सचिनच्या या खेळीनंतर वॉर्नने सांगितले होते की, सचिन आपल्या स्वप्नातही षटकार मारून घाबरवायचा. पण एका मुलाखतीत शेन वॉर्नने हे वक्तव्य मजा म्हणून केल्याचंही म्हंटल होतं. 1993 च्या ऍशेस मालिकेत शेन वॉर्नने इंग्लंडच्या माईक गॅटिंगची विकेट घेतली होती. हा टाकलेला चेंडू खूप खास होता. त्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे संबोधण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :-
कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
शेन वॉर्नच्या निधनामुळे बॉलिवूडलाही बसला जबर धक्का, अनेक सेलेब्रिटींनी व्यक्त केलं दुःख; म्हणाले..
‘ती नसती तर मी पुढे जाऊ शकलो नसतो’, विराट कोहलीने सगळ्यात स्पेशल व्यक्तीबद्दल केला खुलासा