पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी गेलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना सायंकाळी डांगे चौक मंगलनगर येथे घडली.
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात रोड शो करत असताना ही घटना घडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेमहाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचे थेरगाव परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करत होते.
प्रचारादरम्यान सायंकाळी काही लोक तेथे आले. त्यांनी शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. यात भोसले यांच्या हाताला जबर दुखापत झाली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोरख पाषाणकर यांचा पाय मोडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील ज्युपीटर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आम्ही प्रचार करत होतो, त्यांनी थेट येऊन मारहाण केली असा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे.
चार ते पाच जणांनी हल्ला करून मारामारी सुरू केली. हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत. ही गुंडगिरी आहे. सुदैवाने आज मी वाचलो. याबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती देण्यात आली आहे. आम्ही प्रचार करत होतो, त्यांनी थेट येऊन आम्हाला मारहाण केली.
माझा कुणाशीही वैयक्तिक वाद नाही. यापूर्वी भाजपचा उमेदवार माझ्याविरोधात लढला, हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांनी योजना आखून मला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून हल्ला केल्याचे सचिन भोसले यांनी सांगितले.
चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही पक्षांकडून सभा आणि रॅली सुरू आहेत. त्यातच सायंकाळी महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील शिवसेना अध्यक्ष सचिन भोसले यांना मारहाण झाली आहे.
या मारहाणीत भोसले यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ब्लेडने वार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार आज सायंकाळी सुरू होता. सचिन भोसले यांनी प्रचारात सहभाग घेतला.
मात्र प्रचारादरम्यान अज्ञात लोकांनी येऊन हाणामारी सुरू केली. त्यांच्यावर काही लोकांनी ब्लेडने वार केल्याचेही सांगण्यात येत आहे. ही घटना चिंचवड परिसरातील गणेश नगर परिसरात घडली.
याबाबत सचिन भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नाना काटे यांचा प्रचार सुरू असताना काही लोकांनी रस्ता अडविण्याच्या बहाण्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी माझ्यावर ब्लेडने वारही केले. भाजप कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे.
या घटनेने चिंचवड हादरले आहे. चिंचवड पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सचिन भोसले यांच्यावर सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सचिन भोसले उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत.