सध्या अनेक मुद्यांवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. तर दुसरीकडे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आगामी 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र असे असतानाच कॉंग्रेसमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, कॉंग्रेसला लागलेली गळती.
आगामी निवडणुकीच्या तोंडावरच अनेक नेते कॉंग्रेसची साथ सोडून जातं आहेत. नुकतेच काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर राजस्थानमध्ये पार पडले. मात्र हे चिंतन शिबिर सुरू असतानाच पक्षाला गळती लागली. गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड ही दोन नावं काँग्रेस सोडून जाणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या यादीत नव्याने शामील झाली आहे.
तर आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं काँग्रेसला लागलेल्या गळतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. ‘2024 ची तयारी मोदी आणि त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करत असताना काँग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे. या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झालीय, असं सेनेने म्हंटलं आहे.
सामना अग्रलेखातून शिवसनेने कॉंग्रेसला लक्ष केलं आहे. ‘काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे?,’ असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने चिंता व्यक्त केली आहे. अलीकडे ‘गळती’ हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही, असंही सेनेने म्हंटलं आहे.
दरम्यान, ‘राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत,’ असंही सामना अग्रलेखातून म्हंटलं आहे. सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक’ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक असल्याच सामनामधून म्हंटलं आहे.
पुढे सामना अग्रलेखात म्हंटलं आहे की, ‘कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात काही निर्णय झाले. ‘एक व्यक्ती एक पद’ वगैरे घोषणा झाल्या. घराणेशाहीलाही विरोध झाला, पण जाखड यांच्या पाठोपाठ गुजरातच्या हार्दिक पटेलनेही काँग्रेस सोडली. ज्या राज्यांत आता निवडणुका आहेत, त्या राज्यांत जनसंपर्क असलेल्या नेत्यांना तरी काँग्रेसने सांभाळले पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या
फडणवीसांमुळे आज माझ्यासारखा सातवी नापास गडी दिड लाख पगार घेतोय – सदाभाऊ खोत
संभाजीराजेंना कधीही भाजपचा प्रचार करायला लावला नाही; फडणवीसांनी शिवसेनेला सुनावले
नरेंद्र मोदी की सोनिया गांधी दोघांपैकी कोणता नेता श्रेष्ठ वाटतो? प्रशांत किशोर म्हणाले…
फडणवीस साहेब तुम्ही परत या, आमची सुद्धा केतकी चितळेसारखी अवस्था; सदाभाऊ खोत यांची आर्त हाक