Share

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊतच्या लग्नापूर्वीच्या विधींना झाली सुरुवात; हळदी समारंभाचे फोटो आले समोर

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक रोहित राऊत आणि त्याची गर्लफ्रेंड जुईली जोगळेकर लवकरच विवाहबंधात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरु असून लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. यादरम्यान रोहित आणि जुईलीच्या घरच्या हळदी समारंभाचे फोटो आता समोर आले आहेत.

राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवर रोहित आणि जुईलीच्या घरच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्युईलीला हळद लागली असून यावेळी ती खूपच खूश असल्याचे फोटोत दिसून येत आहे. दुसरीकडे रोहित राऊतलाही हळद लागलेली दिसत आहे. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रोहित आणि जुईलीच्या लग्नाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. पण रोहितने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी रोहितने इन्स्टाग्रामवर जुईलीसोबतचा एक फोटो शेअर लवकरच विवाह करणार असल्याची हिंट दिली होती.

तसेच पोस्टमध्ये त्याने #10daystogo आणि #rohilee हे हॅशटॅग वापरले होते. तर आता त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत. त्यानुसार रोहित आणि जुईली २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

रोहित राऊतने प्लेबॅक सिंगरच्या रूपात ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’, ‘वन वे तिकिट’, ‘अवताराची गोष्ट’, ‘वजनदार’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. मराठीसोबत हिंदीतही त्याने आपल्या गायनाचे कौशल्य दाखवले आहे. हिंदीतील प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’मध्ये २०१९ साली तो झळकला होता.

दुसरीकडे रोहितची होणारी बायको जुईलीसुद्धा गायिका आहे. ती मुळची पुण्याची आहे. जुईलीने ‘सारेगमप सुर नव्या युगाचा’ या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोची ती विजेतासुद्धा बनली. या शोमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही जुईली नेहमीच सक्रिय असते. तसेच तिचं युट्यूब चॅनलदेखील आहे.

 महत्त्वाच्या बातम्या : 

रिअ‍ॅलिटी शोमध्ये मोदींची खिल्ली उडवल्याने सरकार संतापेल; मीडिया हाऊसला पाठवली नोटीस
पुष्पाने धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा १०० कोटींचा आणखी एक सिनेमा हिंदीत प्रदर्शित होणार
सलमान खानला का मागावी लागली सुनील शेट्टीची माफी? वाचा पुर्ण किस्सा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now