‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक रोहित राऊत लवकरच गर्लफ्रेंड जुईली जोगळेकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. नुकताच रोहित आणि जुईलीचा साखरपुडा समारंभ (Rohit Raut And Juilee Joglekar Engagement) पार पडला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रोहित आणि जुईली जोगळेकरचा शुक्रवारी साखरपुडा समारंभ पार पडला. यादरम्यानचे फोटो रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये दिसत आहे की, रोहित हाफ व्हाईट कलरची शेरवानी घातली आहे. तर जुईलीने व्हाईट कलरची साडी नेसलेली दिसत आहे. तसेच दोघेही त्यांच्या साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसून येत आहेत. दोघेही या फोटोत खूपच खूश दिसत आहेत.
रोहित-जुईलीचा साखरपुडा समारंभादरम्यानचा आणखी एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोघे एकमेकांच्या हातात अंगठी घालताना दिसून येत आहेत. तसेच दोघेही यावेळी एकमेकांना मिठी मारत भावूक झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची फारच पसंती मिळत आहे.
https://www.instagram.com/reel/CY_f_2_KlGV/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, रोहित-जुईली उद्या २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. साखरपुडा समारंभानंतर त्यांचा मेहंदी समारंभही पार पडला आहे. तर आज त्यांचा हळदी समारंभ पार पडणार आहे. रोहित आणि जुईलीच्या लग्नाला आता केवळ एकच दिवस शिल्लक असून दोघेही लग्नासाठी खूपच उत्सुक आणि खूश आहेत.
रोहित आणि ज्युईलीच्या लग्नाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. पण रोहितने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी रोहितने इन्स्टाग्रामवर ज्युईलीसोबतचा एक फोटो शेअर लवकरच विवाह करणार असल्याची हिंट दिली होती. त्यानुसार रोहित आणि जुईली २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
रोहित राऊतने प्लेबॅक सिंगरच्या रूपात ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’, ‘वन वे तिकिट’, ‘अवताराची गोष्ट’, ‘वजनदार’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. मराठीसोबत हिंदीतही त्याने आपल्या गायनाचे कौशल्य दाखवले आहे. हिंदीतील प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’मध्ये २०१९ साली झळकला होता.
दुसरीकडे रोहितची होणारी बायको जुईलीसुद्धा गायिका आहे. ती मुळची पुण्याची आहे. जुईलीने ‘सारेगमप सुर नव्या युगाचा’ या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोची ती विजेतासुद्धा बनली. या शोमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही जुईली नेहमीच सक्रिय असते. तसेच तिचं युट्यूब चॅनलदेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
नीना गुप्ता यांच्या उत्तराने कपिलची बोलती झाली बंद; म्हणाल्या, माझे इतके मोठे बुब्स नाहीत मग..
‘या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही, झोपही लागत नाही’; डिसले गुरूजींच्या डोळ्यात आलं पाणी
..तर वडीलांच्या संपत्तीवर मुलीचाही अधिकार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय