Share

‘हे मर्दांचं राज्य आहे त्यामुळे बलात्कारांमध्ये नंबर वन आहोत’; काॅंग्रेस मंत्र्याची जीभ घसरली

congress

गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. राज्यातही बलात्काराच्या अनेक भयानक घटना घडत आहे. असे असताना आता काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राज्याचे वीज पुरवठा मंत्री एस. के. धारीवाल यांनी यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.

राजस्थानच्या विधिमंडळात सध्या अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान राज्यातल्या बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये नंबर वन, कारण राजस्थान हे मर्दांचं राज्य, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

विधानसभेत बोलताना धारिवाल यांनी राजस्थान राज्य बलात्काराच्या बाबतील देशात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगितले. याचे कारण म्हणजे राजस्थान हा मर्दांचे राज्य असल्याने इथे जास्त बलात्कार होत असल्याचे धक्कादायक आणि लाजिरवाणं वक्तव्य त्यांनी केले. हे विधान करताना धारीवाल चक्क हसत होते.

दरम्यान, यावेळी राजस्थान पहिल्या क्रमांकावर का आहे? याविषयी बोलताना धारीवाल यांनी हे वादग्रस्त विधान केले. “आता हे असं का आहे? कुठे ना कुठे चूक तर आहेच. तसाही राजस्थान पुरुषांचाच प्रदेश राहिला आहे. हे मर्दांचं राज्य, आता त्याचं काय करणार?”, असं धारीवाल म्हणाले.

तर दुसरीकडे धारीवाल यांनी केलेल्या विधानानंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. अखेर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, विधानसभेमध्ये बोलताना माझी जीभ घसरली. मला, ‘इस प्रदेश में ये मरज़ कहां से आ गया’ असे म्हणायचे होते, परंतु चुकून ‘ये मर्दों का प्रदेश है’, असे उद्गार तोंडातून बाहेर पडले, असे त्यांनी म्हंटले.

काही दिवसांपूर्वीच हरियाणामध्ये सामूहिक बलात्काराच्या वाढत्या घटनांवर इथल्या काँग्रेसचे हरियाणाचे प्रवक्ते धर्मवीर गोयत यांनी, मुलींवर बलात्कार होत नाही तर मुली आपल्या मर्जीनं शारीरिक संबंध ठेवतात, असं वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा त्यांच्यावर देखील टीकेचा भडीमार झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या
पत्नीला वाचवण्यासाठी डाॅक्टरची तडफड; गहाण ठेवली MBBS ची डिग्री गहाण; कहाणी वाचून येईल डोळ्यात पाणी
भाजपच्या ‘या’ रणनितींमुळे योगींना पुन्हा रचता आला इतिहास, जाणून घ्या कसे मिळाले भाजपला बहूमत
क्रिकेटच्या नियमात मोठा बदल! फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूंसाठी असणार ‘हे’ नवे नियम
स्वप्नील बांदोडकरच्या पत्नीचे अभिनेत्री पल्लवी जोशीशी आहे ‘हे’ नाते, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर झाला खुलासा

इतर क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now