इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सकडून सात गडी राखून पराभूत होऊन राजस्थान रॉयल्स उपविजेते ठरले. राजस्थानने संपूर्ण सीजनमध्ये प्रभावी कामगिरी केली. संघाचा सलामीवीर जोस बटलरने ऑरेंज कॅप आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहलने पर्पल कॅपवर कब्जा केला. या संघातील आणखी एक खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात राहिला, त्याचे नाव आहे रियान पराग. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात पराग आणि हर्षल पटेल यांच्यात जोरदार वाद झाला होता.(Harshad Patelne, Ryan Parag, Indian Premier League)
रियान पराग बॅट आणि बॉलने काही खास पराक्रम दाखवू शकला नाही, पण मैदानावरील त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे तो चर्चेत राहिला. त्याने सीजनमध्ये सर्वाधिक १७ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातही तो आणि हर्षल पटेल एकमेकांशी वाद घालताना दिसले होते. मात्र, त्यावेळी हे प्रकरण काय आहे हे कळू शकले नाही. आता रियान परागने याविषयी मौन सोडले आहे.
आयपीएल २००८च्या पहिल्या सत्रानंतर राजस्थान रॉयल्सला प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळाले. राजस्थानने त्या सीजनमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. पण या सीजनमध्ये त्यांना गुजरात टायटन्स या नव्या फ्रेंचायझीकडून पराभव पत्करावा लागला. या सीजनमध्ये रियान परागने १४ डावात १८३ धावा केल्या. RCB विरुद्धच्या सामन्यात, परागच्या जलद अर्धशतकाने (३१ चेंडूत ५६*) राजस्थानच्या डावाला पुनरुज्जीवित केले कारण संघाने २० षटकात १४४/८ धावा केल्या.
मात्र, या डावानंतर रियान पराग आणि हर्षल पटेल यांच्यात संघर्ष स्पष्टपणे दिसून आला. परागने त्याच्याकडे हात पुढे केल्यावर हर्षलने हात मिळवला नाही आणि पुढे निघून गेला. युवा खेळाडू रियान परागने यावर मौन तोडले आणि सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही आरसीबीविरुद्ध खेळत असताना हर्षल पटेलने मला आऊट केले. त्याने हाताने इशारा करून मला जायला सांगितले तेव्हा मला ते समजले नाही मी ते नंतर रिप्लेमध्ये पाहिले.
मग या सीजनमध्ये जेव्हा मी हर्षल पटेलच्या शेवटच्या ओवरमध्ये (आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीविरुद्ध) मोठा शॉट मारला, तेव्हा मी तोच हावभाव केला. याव्यतिरिक्त मी काहीच बोललो नाही, मी गैरवर्तन केले नाही. मात्र, तेवढ्यात सिराज आला आणि म्हणाला, तू लहान आहेस, लहानांसारखे राहा. मी त्याला सांगितले की भाऊ, मी काही बोलत नाही. त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आले आणि प्रकरण तिथेच संपले. नंतर डावाच्या शेवटी हर्षलने माझ्याशी हस्तांदोलन केले नाही.
महत्वाच्या बातम्या-
हे शिवलिंग नसून कारंज्याचा मधोमध तुटलेला दगड; व्हायरल व्हिडिओवर काँग्रेसच नेत्याचं विधान
VIDEO: रश्मिका मंदान्नाच्या ‘त्या’ व्हिडिओवर आल्या अश्लील कमेंट्स; लोक म्हणाले, ब्रा कुठंय?
डोंबिवली रेल्वे स्थानकात जोडप्याला किस करताना पकडले, व्हायरल व्हिडिओवर नेटकरी संतापले
मोदींना मारण्याच्या व्हिडीओवर पटोलेंनी मारली पलटी; म्हणाले मी मोदी नावाच्या गुंडाबाबत…