ruturaj gaikwad talking about yuvraj singh | विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने खुप धुमाकूळ घातला होता. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात तब्बल ७ षटकार ठोकले होते. त्याने चेंडूत ६ षटकार तर मारलेच वरुन नो बॉल असलेल्या चेंडूवरही त्याने षटकार खेचला.
क्रिकेट इतिहासात एका षटकात ७ षटकार ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्या घातक फलंदाजीचे देशातच नाही, तर जगभरात कौतूक होत आहे. त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केल्यामुळे सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. या सामन्यात त्याने १५९ चेंडूंमध्ये २२० धावा ठोकल्या आहेत.
ऋतुराज जेव्हा १४७ चेंडूत १६५ धावांवर खेळत होता, तेव्हा त्याने ७ षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. उत्तर प्रदेशच्या संघातील शिवा सिंगच्या प्रत्येक बॉलवर त्याने षटकार मारला आहे. ४९ व्या षटकात ऋतुराज गायकवाडने ही कमाल करुन दाखवली आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर ऋतुराजने बीसीसीआयशी संवाद साधला होता. यावेळी त्याने ७ षटकार ठोकण्याचा गुपित सांगितलं आहे. षटकातील पाचवा षटकार मारल्यानंतर फक्त एकच व्यक्ती माझ्या मनात होती ती म्हणजे युवराज सिंग, असे ऋतुराज गायकवाडने म्हटले आहे.
टी २० मध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा युवराज हा पहिला भारतीय खेळाडू होता. २००७ मध्ये टी २० वर्ल्डकपच्या इंग्लडविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. तेच त्याच्या डोक्यात असल्याचे ऋतुराज गायकवाडने म्हटले आहे.
वर्ल्डकपदरम्यान मी लहान होतो. तेव्हा मी युवराजला एका षटकात सहा षटकार मारताना पाहिले होते. मला त्याच्या सारखाच विक्रम करायचा होता. त्यामुळे पाच षटकार बसल्यानंतर सहावा षटकार मारण्याचं मी ठरवलं. मी एका षटकात सहा षटकार मारेल असे मलाही कधी वाटले नव्हते. पण माझ्या या विक्रमामुळे मी खुप आनंदी आहे, असे ऋतुराज गायकवाडने म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने खुप घातक फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने १० चौकार आणि १६ षटकार लगावले. त्याने १५९ चेंडूत तब्बल २२० धावा ठोकल्या. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून चाहते चांगलेच खुश झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
payal : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरूणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण पुढे..
aurangabad : आईचं दुर्लक्ष आणि चिमुकल्याने दोन मिनिटांत गमावला जीव, घडलेली घटना ऐकून हादरुन जाल
मनसेची सपशेल माघार! राज ठाकरेंना धमकावणाऱ्या ब्रिजभूषणच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही






