Share

Ruturaj Gaikwad : भारतीय संघातून हकालपट्टी झाल्यावर ऋतुराजने दाखवली ताकद; १७ चेंडूत ठोकल्या ७८ धावा

ruturaj gaikwad

ruturaj gaikwad scored hundred  | सय्यद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या एका दमदार फलंदाजाने तुफानी खेळी केली आहे. हा खेळाडू नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा भाग होता.

ट्रॉफीमध्ये याच खेळाडूने शतक ठोकले आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऋतुराज गायकवाड हा आहे. ऋतुराजला पहिल्या सामन्यात संधी मिळाली होती. पण त्याला काही कमाल करता आली नव्हती. त्यामुळे त्याची प्लेईंग ११ मधून हकालपट्टी करण्यात आली होती.

महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस यांच्यातील सय्यद मुश्ताक अली करंडक २०२२ च्या २४ व्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडने तुफानी खेळी केली. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने ६५ चेंडूंचा सामना करत १७२.३१ च्या स्ट्राईक रेटने ११२ धावांचे स्फोटक शतक झळकावले.

ऋतुराज गायकवाडनेही या खेळीत तब्बल १२ चौकार आणि ४ षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाड पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

हा सामना ऋतुराज गायकवाडचा पदार्पण सामना होता. त्याने ४२ चेंडूत फक्त १९ धावा केल्या. या खराब खेळानंतर त्याला उर्वरित दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली नाही. ऋतुराज गायकवाडने टीम इंडियासाठी ९ टी २० सामनेही खेळले आहेत. पण त्याचा हा वनडे सामना पहिलाच होता.

दरम्यान, ट्रॉफीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाची खेळी खेळली, मात्र त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. कारण गायकवाड वगळता एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा गाठता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या. तर सर्व्हिसेस संघाने हे लक्ष्य १९.२ षटकांत ५ विकेट्स गमावून पूर्ण केले.

महत्वाच्या बातम्या-
Uttar Pradesh : भिंतीत सापडला लाखोंचा खजिना, घर पाडत असताना पडला चांदीच्या नाण्यांचा पाऊस
Sharad kelkar : ‘शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असेल तर….’; अभिनेत्याने पत्रकाराला झाप झाप झापलं
Dharmendra: जावेद अख्तरच्या ‘त्या’ दाव्यावर धर्मेंद्र संतपाले, म्हणाले, दिखावे की इस दुनिया में…

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now