ruturaj gaikwad fans commented on sayali sanjeev photo | विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने खुप धुमाकूळ घातला आहे. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात तब्बल ७ षटकार ठोकले होते. त्याने चेंडूत ६ षटकार तर मारलेच वरुन नो बॉल असलेल्या चेंडूवरही त्याने षटकार खेचला.
क्रिकेट इतिहासात एका षटकात ७ षटकार ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्या घातक फलंदाजीचे देशातच नाही, तर जगभरात कौतूक होत आहे. त्याने वर्ल्डरेकॉर्ड केल्यामुळे सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. अशात पुन्हा एकदा त्याच्या आणि अभिनेत्री सायली संजीवच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
ऋतुराजने मोठी खेळी खेळताच चाहत्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. वहिनी मॅच पाहिली का? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. सायलीने नुकतंच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. त्याच फोटोवर लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.
सायलीच्या पोस्टचा आणि ऋतुराज गायकवाडच्या खेळीचा तसा काहीही संबंध नाही. असे असतानाही काही चाहत्यांनी त्यावर ऋतुराजचे नाव घेत कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे सायलीची पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एका चाहत्याने म्हटले की, मॅच बघितली का वहिनी? काय बॅटींग केलीय आमच्या भावानं. तर दुसरा एक म्हणाला, ६,६,६,६,६,६(नो बॉल),६ ऋतुराजने ७ षटकार मारलेत ते पण एकाच ओव्हरमध्ये. तर आणखी एक नेटकरी म्हणाला की, आज माझ्या मित्राने खुप भारी बॅटींग केली वहिनी.
दरम्यान, उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने खुप घातक फलंदाजी केली आहे. या सामन्यात त्याने १० चौकार आणि १६ षटकार लगावले. त्या सामन्यात १५९ चेंडूत तब्बल २२० धावा ठोकल्या आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून चाहते चांगलेच खुश झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Akola : रुढी-परंपरा तोडत दिराने केलं वहिणीशी लग्न, दिवंगत भावाचं कर्जही घेतलं आपल्या डोक्यावर
सुर्यावर अजूनही अन्याय? शानदार फॉर्ममध्ये असतानाही संघातून वगळले; आता दिले ‘हे’ कारण
विनोद कांबळी होणार टिम इंडीयाच्या निवड समितीचा अध्यक्ष?