Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. यात त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. त्याने एकाच षटकात 7 षटकारांसह 43 धावा कुटल्या. एकाच षटकात ७ षटकार मारणारा तो जगातील पहीला फलंदाज ठरला.
त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्र संघाने 5 गडी गमावून 330 धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील शेवटच्या 8 डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावता येतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग होता. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे 13वे शतक आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील 49 वे षटक टाकत होता. त्याला ऋतुराजने सलग ४ षटकार मारले होते. त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. पुढच्या दोन चेंडूंवरही ऋतुराजने षटकार खेचला. अशाप्रकारे, त्याने एका षटकात 7 षटकार आणि एका नो चेंडूसह एकूण 43 धावा केल्या.
एका षटकात 7 षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. सामन्याच्या सुरुवातीला यूपीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 41 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. राहुल त्रिपाठी 9 आणि सत्यजीत 11 धावा करून बाद झाला.
मात्र कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाजूला उभे राहिले. त्याने अंकित बावणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अंकित 54 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. ऋतुराज गायकवाडने 109 चेंडूत शतक पूर्ण केले. आणि 138 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला. म्हणजेच त्याच्या पुढच्या 50 धावा फक्त 29 चेंडूत आल्या.
159 चेंडूत 220 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने अजी काझीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अझीम 42 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. 2 चौकार आणि 2 षटकार मारले. कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 66 धावा देत 3 बळी घेतले.
ऋतुराजने भारतासाठी एक वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यापूर्वी त्याने 69 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 3538 धावा केल्या होत्या. त्याने 12 शतके आणि 16 अर्धशतके केली होती. त्याची नाबाद 187 धावांची सर्वोत्तम खेळी होती. त्याने टी-20मध्ये एकूण 3 शतके झळकावली आहेत.
ऋतुराज गायकवाडने मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारताकडून सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे.
महत्वाच्या बातम्या
Ruturaj Gaikwad : भारतीय संघातून हकालपट्टी झाल्यावर ऋतुराजने दाखवली ताकद; १७ चेंडूत ठोकल्या ७८ धावा
पुणेकर ऋतुराज गायकवाडने दाखवले पुणेरी गुण; खोडी काढणाऱ्या चहलची घेतली फिरकी, पाहा व्हिडीओ
ऋतुराजचे राज! गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १२ चेंडूत ठोकल्या ६० धावा; पाहा धडाकेबाज खेळी