Share

Rutuja Latake : नियमांत असूनही ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर नाही, ठाकरे गट मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत

rutuja latake resign letter not aprove  | अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीवर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या निवडणूकीत ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. लटके यांना निवडणूकीचा अर्ज भरायचा आहे. पण त्यांच्या या अर्जात अनेक अडचणी येत आहे. त्यांचा अद्यापही राजीनामा मंजूर झालेला नाही.

राजकीय दबावामुळे त्यांचा राजीनामा स्वीकाराला जात नसल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. असे असताना आता ऋतुजा लटके याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. तसेच त्या दृष्टीने शिवसेनेची हालचाली सुद्धा सुरु झाली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यांचा राजीनामा अद्यापही महापालिकेने मंजूर केलेला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारीचा अर्जही भरता येत नाहीये. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. तर ठाकरे गटाला दुसरा उमेदवार द्यावा लागेल. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जिंकणे सोपे होईल असा प्लॅनही शिंदे फडणवीस यांचा असल्याचे म्हटले जात आहे.

ऋतुजा लटके या अंधेरी पुर्व कार्यालयात कर्मचारी होत्या. पण त्यांनी महिनाभरापूर्वीच राजीनामा दिला होता. पण त्यांचा राजीनामा अजूनही मंजूर झालेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाचं आणि महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. सध्या उद्धव ठाकरेंची कोंडी केली जात असल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या नियमावलीमुळे ठाकरे गटासमोर अडचण उभी राहिली आहे. नियमावली १९८९ नुसार एकाद्या कर्मचाऱ्याला स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असल्यास तीन महिने आधी द्यावी लागते. पण राजीनामा द्यायचा असेल, तर एक महिना आधी नोटीस द्यावी लागते. तसेच राजीनामा देताना एक महिन्याचा पगार जमा करायचा असतो.

त्यानुसार ठाकरे गटाने एक महिन्याचा पगार म्हणजेच ६७ हजार रुपये शिवसेनेनं जमा केला आहे. पण राजीनामा अजूनही मान्य झालेला नाही. त्यामुळे ठाकरे गट वेगवेगळी पावले उचलत आहे. असे असताना आता ऋतुजा लटके यांच्यासाठीही ठाकरे गटही कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nurse: काय सांगता? कोमातून बाहेर आल्यानंतर नर्स म्हणाली, मला देव भेटला; डॉक्टरांनाही दिला ‘हा’ पुरावा
spiders: खतरनाक! ‘या’ व्यक्तीने आपल्या खोलीत पाळलेत ३०० विषारी कोळी, डॉक्टरही झाले हैराण
NCP : अंथरुणाला खिळून असतानाही १७ वर्षे पक्षसेवा करणारा राष्ट्रवादीचा योद्धा हरपला, शेवटी अजितदादांचा डिपी लावला अन्..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now