रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासंदर्भात सध्या चर्चा आहेत. गुप्तचर यंत्रणा MI६च्या प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. पुतीन यांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात आली असून पुतीन यांच्या जागी त्यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती रशियावर राज्य करत आहे, असा खळबळजनक दावा गुप्तचर यंत्रणा MI६च्या एका अधिकाऱ्याने केला आहे.
मागील काही महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची तब्येत खराब झाल्याचं बोललं जातं आहे. सर्वात शेवटी युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन माध्यमांमध्ये दिसले होते, तेव्हा त्यांचा चेहरा फुगलेला दिसल्याचं बोललं जातं आहे. त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचाही दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आता ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय६ ने देखील गंभीर आजारामुळे व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो आणि रशियाकडून ही सर्वांत गंभीर बाब लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका उपस्थित केली आहे.
पुतीन यांच्या मृत्यूचे सत्य समोर आले तर युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियाच्या सैन्याला मघारी यावे लागेल ही भीती पुतीन यांच्या सहकाऱ्यांना भेडसावत आहे. जर, असे झाले तर रशियात सत्ताबदल होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच पुतीन यांच्या मृत्यूचे सत्य दडवून टाकण्यात आले आहे, असेही बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटी पुतीन माध्यमांसमोर दिसले तो व्हिडीओ आधीच रेकॉर्ड केलेला जुना व्हिडीओ असू शकतो. रशियाच्या विजय दिनाच्या दिवशी देखील मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे कोणीतरी दुसराच पुतीन सारखा दिसणारा व्यक्ती होता.
गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो आणि ती माहिती लपवली जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तसेच स्वतः पुतीन यांनीच ते आजारी पडले तेव्हा आपल्या बहुरूप्याला नियुक्त केल्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे.