रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधून अनेक अस्वस्थ करणारे व्हिडिओ समोर येत आहेत. युरोपीय देशांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांची अवस्था देखील घाबरवणारी आहे. अशाच एका व्हिडिओने संपूर्ण भारत हादरला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये एक मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.( Russian soldiers kidnap Indian girls)
वास्तविक, रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये भारतीय मुलींना पळवून नेल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुळची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील असणा-या गरिमा मिश्रा म्हणाली की ती आणि तिच्या सोबत इतर काहीजण युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकले आहेत. ती म्हणाली की रशियन सैन्याने त्यांना वेढले आहे.
हा व्हिडीओ कधीचा आहे हे माहीत नाही, पण 27 फेब्रुवारीला सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी 1 मार्च रोजी सर्व भारतीयांनी कीव सोडल्याची घोषणा केली. व्हिडिओमध्ये गरिमाने दावा केला आहे की विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता, परंतु कोणीही मदत करत नाही आणि आम्हाला काही मदत मिळेल की नाही हे मला माहित नाही.
https://twitter.com/IndiaInGraphics/status/1497956378803339267?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1497956378803339267%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fhindi%2Ftimesnownewshindi-epaper-tnnhin%2Fvideorusisainikonebharatiyladakiyokouthakarlegaiyukrenmephansilakhanaukibetinepmselagaiyeguhar-newsid-n364292842%3Fs%3Dauu%3D0xf8a7e17873b61f5fss%3Dwsp
पुढे गरिमाने सांगितले की, त्यांनी बस, ट्रेन किंवा कारने ते ठिकाण सोडण्याचा विचार केला, परंतु एका घटनेने त्यांची हिम्मत झाली नाही. एका मैत्रिणीने तिला सांगितलेला एक प्रसंग आठवून ती म्हणाली की, कीवहून बस किंवा कॅबने जाणाऱ्या भारतीय मुलींना रशियन सैनिकांनी उचलून नेले. तसेच गरिमा म्हणते की, माझ्या मित्राने आम्हाला सांगितले की रशियन सैन्याने विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्यानंतर रशियन सैनिकांनी भारतीय मुलींना ग्रुपमधून दूर नेले आणि मुलांना मागे सोडले. मुली कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही.
नंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना युद्धग्रस्त देशापासून वाचवण्याचे आवाहन केले. पुढे रडत रडत गरिमा म्हणाली की ते असे चित्रपट पहायचे ज्यात हिरो भारतीयांना या परिस्थितीतून बाहेर काढायचे. आम्हालाही असचं कोणीतरी या परिस्थितीतून बाहेर काढतील अस वाटायचं, पण आता आम्हाला वाटत नाही की, यातून आम्ही बवाचू शकेल.
गरिमाने विनवणी केली की, “सरकार… कृपया आम्हाला वाचवा, कृपया भारतीय सैन्य पाठवा.” गरिमा हात जोडून म्हणाली की जे पाहत आहेत त्यांनी कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.” “जय हिंद!, जय भारत!” गरिमा मिश्रा यांच्या दाव्याची सत्यता पडताळता येत नाही, परंतु सोशल मीडियावर नक्कीच खळबळ उडाली, अनेकांनी सरकारकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता लोखंडेने विकत घेतली आलिशान मर्सिडीज कार, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस
अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..