युक्रेनच्या रस्त्यांवर रशियन सैनिकांना पकडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता एका ताज्या प्रकरणात युक्रेनमध्ये एका रशियन सैनिकाला पकडण्यात आले आहे. यानंतर रशियन सैनिकाने आत्मसमर्पण केले. रशियन सैनिकाजवळ उपस्थित युक्रेनच्या लोकांनी माणुसकी दाखवत त्याला चहा आणि पेस्ट्री दिली. एका महिलेने त्याचे सांत्वन केले, त्याला तिचा फोन दिला आणि त्याला त्याच्या आईशी बोलण्यास सांगितले. आईचा आवाज ऐकून रशियन सैनिक रडू लागला.(Russian soldiers cry after surrender in Ukraine)
या संपूर्ण घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक युक्रेनियन व्यक्ती म्हणतोय, ‘हे युवक आहेत, त्यांचा दोष नाही. हे सैनिक इथे कसे आले आहेत ते त्यांना कळत नाही. ते जुने नकाशे वापरत आहेत आणि हरवले आहेत. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रशियन सैनिकाच्या आत्मसमर्पणानंतर स्थानिक लोक त्याचे स्वागत करत जेवण देत असल्याचे दिसत आहे.
या व्हिडिओचे कॅप्शन आहे, ‘रशियन सैनिकांनो आत्मसमर्पण करा, युक्रेनचे लोक तुम्हाला अन्न देतील. फक्त शरण जा. या बातमीत दावा केला जात आहे की, रशियन सैनिकांचे मनोधैर्य खचले असून ते न लढता आत्मसमर्पण करत आहेत. असे आणखी बरेच व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात रशियन सैनिक रडत असल्याचे दिसत आहे आणि त्यांना युक्रेनमध्ये काय हवे आहे हे देखील माहित नाही.
रेडिओ संदेशांमध्ये रशियन सैनिकांनी युक्रेनियन शहरांवर बॉम्ब टाकण्याचे आदेश धुडकावून लावले. एवढेच नाही तर रशियन सैनिक अन्न आणि इंधन संपत असल्याची तक्रार करत आहेत. युक्रेनच्या सैन्याने आपल्या ध्वजाच्या समोर बसवत पकडलेल्या रशियन सैनिकांचा व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे. यात जखमी रशियन सैनिकाने सांगितले की, हे आमचे युद्ध नाही. माता आणि बायकांनो, तुमच्या पतींना एकत्र करा. इथे राहण्याची गरज नाही.
दुसर्या व्हिडिओमध्ये एक पकडलेला रशियन कैदी युद्धामुळे झालेले मृत्यू आणि विनाशावर रडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रशियन सैनिक आपल्याच सैन्यावर नाराजी व्यक्त करताना सांगतात की, ते मृतदेह उचलतही नाहीत आणि अंत्यसंस्कारही होत नाहीत. यातील एका सैनिकाने रशिया आणि युक्रेनला युद्धभूमीतून मुलांना हटवण्याची विनंती केली, तर दुसऱ्याने युद्ध कोणालाही नको असल्याचा इशारा दिला.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता लोखंडेने विकत घेतली आलिशान मर्सिडीज कार, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस
अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..