युक्रेनमधील एका महिलेवर अनेकवेळा बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यादरम्यान तिच्या पतीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी तिची मुलं महिलेच्या समोर होती. युक्रेनच्या खासदार मारिया मॅगेन्टेवा यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.(Russian soldier rapes woman in front of children)
रिपोर्टनुसार, याआधीही युक्रेनमध्ये काही महिलांसोबत बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. युक्रेनच्या नेत्या मारिया मॅगेन्टेवा म्हणाल्या “कीवमधील या महिलेवर मुलासमोर बलात्कार झाला.” या प्रकरणी आम्ही शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी, त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल, ज्याच्यासमोर त्याच्या आईवर हा प्रकार घडला आहे.
युक्रेनच्या प्रॉसिक्युटर जनरल इरिना वेनेडिक्टोव्हा यांनीही या संदर्भात तपास करण्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरात घुसलेले रशियन सैनिक दारूच्या नशेत होते. आधी त्यांनी महिलेच्या पतीची हत्या केली, त्यानंतर महिलेवर वारंवार बलात्कार केला. हे जवान इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी त्या निष्पाप चिमुरड्याला धमकावल्याचा आरोप आहे.
युक्रेनच्या प्रॉसिक्युटर जनरल इरिना वेनेडिक्टोव्हा यांनी सांगितले की, पूर्वी कीवमधील ब्रोव्हरी येथे दोन सैनिकांनी महिलांवर हल्ला केला होता. यामध्ये एका सैनिकाचीही ओळख पटली असून त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात युक्रेनच्या इरपिन शहरातून पळून आलेल्या एका महिलेने रशियन सैनिकांवर बलात्कार आणि गोळीबार करत असल्याचा आरोप केला होता.
अनातासिया तरन नावाची ही 30 वर्षीय महिला इरपिनमध्ये रशियन हल्ल्यापूर्वी वेट्रेस म्हणून काम करत होती. यावेळी इरपिन नरक बनल्याचे त्यांनी सांगितले. तरन म्हणाली की, रशियन सैनिक फक्त लोकांना मारत आहेत. महिलांवर बलात्कार करत आहेत. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा आणि विरोधी पक्षाच्या खासदार लेसिया वेसिलेंका यांनीही या घटनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
राजकीय भूकंप होणार? भाजपा खासदार आणि संजय राऊतांमध्ये ३ तास खलबत; नेमकं काय घडतंय?
कौतुकास्पद! दीपिका पादुकोणने विदेशात वाढवला भारताचा मान; मिळवला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
या मुस्लिम व्यक्तीने लटकावला पशुपतिनाथ मंदिरात ३७०० किलोचा सर्वात मोठा घंटा, मोठे-मोठे इंजिनीअर झाले फेल
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव