Share

“तो माझा नाही, मोदीजींचा मुलगा आहे”; युक्रेनमधून विद्यार्थी परतल्यावर वडिलांची भावूक प्रतिक्रिया

sanjay pandita

रशिया आणि युक्रेनमधील वादाचे पडसाद हे इतर देशांवर पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना भारतात आणण्यात यश आले. ‘ऑपरेशन गंगा’ असे या मोहिमेला मोदी सरकारने असे नाव दिले आहे.

सोशल मीडियावर या योजनेतून परत आलेल्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांची माहिती देत मोदी सरकारचं कौतूक करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री उत्तर-पूर्व युक्रेनमधील युद्धग्रस्त शहर सुमी येथून ६७४ भारतीयांचा अखेरचा मोठा गट विशेष विमानांनी मायदेशी रवाना झाले होते. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून तीन विमाने पाठवण्यात आली होती.

या मोहिमेअंतर्गत युक्रेनमधील सुमी येथे अडकलेला ध्रुव भारतात पोहोचला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ध्रुवचे वडील संजय पंडिता भावूक झाले होते. त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत. युक्रेनमधून पंतप्रधान मोदींचा मुलगा परतला आहे, माझा मुलगा नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

माध्यमांशी बोलताना संजय पंडिता म्हणाले, ‘हा माझा मुलगा नसून पंतप्रधान मोदींचा मुलगा असल्याचे सांगितले. त्यांनी त्याला भारतात आणले आहे. तो येईल असे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही आशा सोडली होती.’ असे त्यांनी म्हंटले आहे. त्यांनी भारत सरकारचे आभारही मानले आहेत.

दरम्यान, भारतात आल्यानंतर ध्रुव याने अंगावर काटे आणणारा सुमीमधला आपला अनुभव माध्यमांसमोर सांगितला आहे. “तिथे टिकणे खूप कठीण होते. भारतात परतल्याने दिलासा मिळाला आहे. ऑपरेशन गंगा पार पाडल्याबद्दल भारत सरकारचे आभार,” असे ध्रुवने म्हटले.

मात्र, यावरुन आता राजकारण तापलं आहे. ‘हजारो भारतीय अडकलेले असताना १५० जण मायदेशात परतल्यावर त्याची जाहिरात सुरू आहे,’ या शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या
निर्लज्जपणाचा कळस! घरात घुसून पुतण्याने चुलतीवरच केला बलात्कार, पुण्याच्या घटनेने उडाली खळबळ
फोनवर १००-२०० रुपयांचे स्क्रीन गार्ड लावण्याआधी जाणून घ्या त्यामागचे सत्य; परत नाही करणार ‘ही’ घोडचूक
आजोबांचा नाद नाय! वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केली औषधी वनस्पतींची शेती, आता कमावतात लाखोंमध्ये
‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी विवेक अग्निहोत्रींकडे मागितले ‘एवढे’ रूपये, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now