रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली. तेव्हापासून युद्ध अखंडपणे सुरू आहे. जगाने युद्धविराम करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु रशियन आक्रमण सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दोन्ही देशांच्या प्रमुखांसह जगातील इतर देशांच्या सतत संपर्कात असतात. चर्चेतून समस्येवर तोडगा काढण्याचा भारत सातत्याने सल्ला देत आहे.(Russia-Ukraine war can only end if Modi tries)
दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सोमवारी सांगितले की, युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात मध्यस्थी करण्यासाठी ते भारत, तुर्की, चीन आणि इस्रायल या देशांच्या संपर्कात आहेत. गुटेरेस यांनी पत्रकारांना सांगितले की, राजकीय तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यासाठी दोन्ही बाजूंच्या सर्वोच्च पातळीवर चर्चा करणाऱ्या अनेक देशांशी मी संपर्कात आहे.
ते पुढे म्हणाले, मी तुर्की मित्रांशी खूप काळ संपर्कात आहे. तसेच भारताबरोबरच कतार, इस्रायल, चीन आणि फ्रान्स आणि जर्मनी यांच्याशीही माझा जवळचा संबंध आहे. माझा विश्वास आहे की हे सर्व प्रयत्न हे युद्ध संपवण्यासाठी आवश्यक आहेत. ते सर्व देश त्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहेत का असे विचारले असता, गुटेरेस म्हणाले, “मला तशी आशा आहे.”
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेन तटस्थता घोषित करण्यास आणि देशाच्या बंडखोर पूर्वेकडील भागांवर तोडगा काढण्यास तयार आहे. मंगळवारी युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या चर्चेच्या पुढील फेरीपूर्वी त्यांनी ही घोषणा केली. तथापि, झेलेन्स्की यांनी पुनरुच्चार केला की रशियन नेत्याशी केवळ एक चर्चा युद्ध समाप्त करू शकते. युद्ध थांबवण्याच्या मुद्द्यावर यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स आणि समोरासमोर बोलणे अयशस्वी ठरले होते. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 40 लाख युक्रेनियन नागरिक विस्थापित झाले आहेत.
एका स्वतंत्र रशियन मीडिया आउटलेटला दिलेल्या मुलाखतीत, झेलेन्स्की यांनी संभाव्य सवलतींचे संकेत दिले आणि ते जोडले की युक्रेनचे प्राधान्य हे त्याचे सार्वभौमत्व सुनिश्चित करणे आणि मॉस्कोला त्यांच्या देशापासून वेगळ करण्यापासून रोखणे आहे. झेलेन्स्की म्हणतात की, आम्ही सुरक्षा हमी आणि तटस्थता कायम ठेवण्यासाठी तयार आहोत. तसेच ते हेही म्हणाले की, करार केल्यावर त्यांना सुरक्षितेची गारंटी पाहिजे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, रशियाने युक्रेनकडे पाश्चिमात्य देशांच्या नाटो युतीमध्ये सामील होण्याची आशा सोडण्याची मागणी केली आहे कारण मॉस्को याला स्वतःसाठी धोका मानतो. झेलेन्स्कीने पूर्वी हे उपाय सुचवले होते पण ते इतके खात्रीने बोलले नाहीत. असे मानले जाते की झेलेन्स्कीच्या ताज्या टीकेमुळे इस्तंबूलमधील चर्चेला चालना मिळू शकेल. रशियाने ही मुलाखत प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली आहे.
यूएस संरक्षण विभाग, पेंटागॉनने सांगितले आहे की ते पूर्व युरोपमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) ची सुरक्षा मजबूत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धात तज्ञ असलेली सहा नौदल विमाने तैनात करत आहेत. याशिवाय अमेरिका पूर्व युरोपमध्ये सुमारे 240 मरीन तैनात करत आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, वॉशिंग्टन राज्यातील नौदल तळ असलेल्या व्हिडबे बेटावर आधारित EA-18G ‘ग्रॉलर’ विमान सोमवारी जर्मनीतील स्पॅंगडाहलम विमानतळावर पोहोचेल, जिथे ते तैनात असतील.
पेंटागॉनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने युक्रेन युद्धात वापरली जाणार नाहीत. दरम्यान, अमेरिकेच्या अंतर्गत गुप्तचर मूल्यांकनांवर चर्चा करताना, नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अमेरिकन संरक्षण अधिकार्याने सांगितले की, युक्रेनमधील परिस्थिती थोडी बदलली आहे.
महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
बॉलिवूडच्या फेमस जोडीत आला दुरावा; लग्नाची बोलणी सुरू असतानाच श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय