russia girl married with west bengal boy | पश्चिम बंगालमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली एक रशियन महिला आपला देश सोडून पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील मायापूर शहरात स्थायिक झाली आहे. येथे ती एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्यासोबत साखरपूडा केला आहे.
विशेष म्हणजे या आधी महिलेने मुस्लिम मुलाशी लग्न केले होते. महिलेने दावा केला की तिचा मुस्लिम पती तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. तसेच तिला त्रासही देत होता. त्यामुळे तिने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
स्वेतलाना ओचिलोवा असे या रशियन महिलेचे नाव आहे. तिने सांगितले की ती एक ग्राफिक डिझायनर आहे. तिने एका मुस्लिम तरुणाशी लग्न केले होते. दोघांना एक मुलगाही आहे. पण नंतर स्वेतलानाचा कल कृष्णाच्या भक्तीकडे जाऊ लागला. स्वेतलाना २०१२ मध्ये पहिल्यांदा कृष्ण भक्तांना भेटली होती.
स्वेतलानाला कृष्णाच्या भक्तीमध्ये असलेले तिच्या पतीला आवडत नव्हते. स्वेतलाना म्हणाली की, तिच्या पतीला कृष्ण भक्त आवडत नव्हते. त्याने मला भक्तांना भेटण्यापासून रोखले. त्याने मला अनेक वेळा मारहाण केली आणि माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता.
पतीसोबतच्या भांडणामुळे व्यथित होऊन स्वेतलानाने पतीचे घर सोडले आणि मुलासह तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली. २०१६ ला तिने कृष्णाची भक्ती करण्याची निर्णय घेतला. ती पतीपासून दूर गेली आणि तिने कृष्ण मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली. तिने भारतातील मंदिरांनाही भेटी दिल्या.
स्वेतलाना म्हणाली की, पतीची भीती माझ्या आतून पूर्णपणे नाहीशी झाली. मी आनंदी राहू लागले. २०१७ मध्ये पहिल्यांदा मी माझ्या पतीशी न घाबरता बोलले. त्याने मला कृष्ण आणि त्याच्यात निवड करण्यास सांगितले. म्हणून मी कृष्णाची निवड केली. यानंतर आम्हा दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तो माझ्या आणि मुलामध्ये कधीच आला नाही.
स्वेतलाना नंतर मायापूर शहरात आली आणि आपल्या मुलासोबत राहू लागली. इथे तिने रोशन झा यांची भेट घेतली. तो कृष्णाचा भक्तही आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. यानंतर दोघांनी नुकतीच एंगेजमेंट केली. त्यानंतर तिने पोस्ट केली की, मी साखरपूडा केला आहे. रोशनने मला माझ्या भुतकाळासह मला स्वीकारले आहे.
महत्वाच्या बातम्या-
payal : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरूणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण पुढे..
aurangabad : आईचं दुर्लक्ष आणि चिमुकल्याने दोन मिनिटांत गमावला जीव, घडलेली घटना ऐकून हादरुन जाल
मनसेची सपशेल माघार! राज ठाकरेंना धमकावणाऱ्या ब्रिजभूषणच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही