rushi sunak and ashish nehra trending | ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक पंतप्रधान होणार असल्यामुळे अनेक भारतीय खूश आहेत, तर काहींनी सनकची भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्याशी तुलना केली आहे. तसेच ट्विटरवर नेहरा ट्रेडिंगवर आला आहे.
आता ते दोन्ही सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहेत. ४२ वर्षीय सुनक यांनी रविवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत विजय मिळवला होता. प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंटने ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर लगेचच ऋषी सुनक ट्विटरवर ट्रेंड करू लागले.
४२ वर्षीय सुनक यांचा चेहरा टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आशिष नेहरासारखाच असल्याचे ट्विटरवरील काही यूजर्सचे मत आहे. ऋषी सुनक अभिनंदन करताना अनेकांनी आशिष नेहराचा फोटो पोस्ट केला आहे. इतकंच नाही तर काही सोशल मीडिया युजर्सनी सुनकऐवजी आशिष नेहरालाच ब्रिटनचा पुढचा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले. यासोबतच ब्रिटनमधून ‘कोहिनूर डायमंड’ आणण्यासाठी नेहरा प्लॅन करत आहे, असे काहींनी म्हटले आहे.
एका यूजरने लिहिले की, आशिष नेहरा यांचे यूकेचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन. गुजरात टायटन्ससह आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यापासून ते ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा तुमचा प्रवास खूप छान होता. त्याचवेळी सॉक्रेटिस नावाच्या युजरने लिहिले की, कुंभमेळ्यात ऋषी सुनक आणि आशिष नेहरा हरवले होते.
https://twitter.com/BSharan_6/status/1584577353736368128?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584577353736368128%7Ctwgr%5E56f1320c67a928a3d3947b03c7ad60365d5d07ed%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fsocial-viral%2Frishi-sunak-becomes-uk-britain-prime-minister-indian-cricketer-ashish-nehra-trending-on-twitter-a747%2F
अशात एकाने तर कोहिनूर भारतात कसा आणायचा यासाठी प्लॅनच दिला आहे. तो म्हणाला की, सुनक यांना भारतात बोलावले पाहिजे. जेव्हा तो बेंगळुरूमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकतात तेव्हा आशिष नेहराला ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पाठवले जाईल. मग त्यांच्याकडून कोहिनूर परत करण्यासाठी विधेयक मंजूर करावे. यासाठी कोणत्याही प्लॅन बीची आवश्यकता नाही.
https://twitter.com/taufromthegaon/status/1584578245525397504?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584578245525397504%7Ctwgr%5E56f1320c67a928a3d3947b03c7ad60365d5d07ed%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fsocial-viral%2Frishi-sunak-becomes-uk-britain-prime-minister-indian-cricketer-ashish-nehra-trending-on-twitter-a747%2F
दरम्यान, सुनक यांनी स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया येथून एमबीए केले जेथे ते भारतातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांना भेटले. ऋषी सुनक यांनी २००९ मध्ये अक्षता मूर्तीशी लग्न केले. सुनक दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.
https://twitter.com/nikhilsharmatmk/status/1584558377086042114?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584558377086042114%7Ctwgr%5E56f1320c67a928a3d3947b03c7ad60365d5d07ed%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fsocial-viral%2Frishi-sunak-becomes-uk-britain-prime-minister-indian-cricketer-ashish-nehra-trending-on-twitter-a747%2F
https://twitter.com/FreedomMaximal/status/1584544533387149312?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584544533387149312%7Ctwgr%5E56f1320c67a928a3d3947b03c7ad60365d5d07ed%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fsocial-viral%2Frishi-sunak-becomes-uk-britain-prime-minister-indian-cricketer-ashish-nehra-trending-on-twitter-a747%2F
https://twitter.com/mishmanaged/status/1584566635670609920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584566635670609920%7Ctwgr%5E56f1320c67a928a3d3947b03c7ad60365d5d07ed%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fsocial-viral%2Frishi-sunak-becomes-uk-britain-prime-minister-indian-cricketer-ashish-nehra-trending-on-twitter-a747%2F
महत्वाच्या बातम्या-
narendra modi : महाराष्ट्रातील ‘ही’ यात्रा ठरणार मोदींच्या पराभवाचे कारण; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
supriya sule : ..अन् सुप्रिया सुळेंनी शब्द पाळला; बारामतीकरांनी पेढे वाटून केला जल्लोष, वाचा नेमकं घडलं काय?
Virat Kohli : तुला लाज वाटत नाही का? भारताने सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने केलेल्या ट्विटमुळे विराटचे चाहते भडकले