Share

Rupali Thombare on Nishikant Dubey: तू काय आपटून मारशील? तुला आम्हीच आपटून मारू; अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दुबेंना ठणकावले

Rupali Thombare on Nishikant Dubey:  भाजप (BJP) चे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena) चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात मोठा वाद पेटला असून आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – Ajit Pawar) या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते निशिकांत दुबे ?

निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी ठाकरे बंधूंवर “घाणेरडं राजकारण” केल्याचा आरोप करत, “जर तुम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे खरे वारसदार असाल, तर माहीम दर्ग्यावर (Mahim Dargah) जा आणि उर्दू भाषिकांवर कारवाई करून दाखवा,” असं खुले आव्हान दिलं. पुढे ते म्हणाले, “तुमच्या घरात सिंह असतो म्हणता, मग हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या. महाराष्ट्राबाहेर पडा. आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू आणि दाखवून देऊ.”

याशिवाय, महाराष्ट्राविषयी बोलताना ते म्हणाले, “टाटा (Tata), बिर्ला (Birla), रिलायन्स (Reliance) मुंबईत टॅक्स भरतात. तुम्ही कोणता कर भरता? महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो. उद्योग, खाण, रिफायनरी हे सगळं इतर राज्यांत आहे. तुम्ही फक्त आमचे शोषण करता. जर हिंमत असेल तर उर्दू, तमिळ, तेलुगू भाषिकांनाही विरोध करा.”

रुपाली ठोंबरे यांचा जोरदार प्रतिउत्तर

या वादग्रस्त विधानांनंतर रुपाली ठोंबरे यांनी उत्तर देताना स्पष्ट शब्दांत हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं, “दुबे जरी आमच्या मित्रपक्षाचे खासदार असले तरी त्यांनी मराठीबद्दल असभ्य बोलू नये. तुम्ही तुमची भाषा झारखंडमध्ये (Jharkhand) वापरा, महाराष्ट्रात (Maharashtra) नाही. मराठी माणूस बाहेर गेला की ती त्याची कर्मभूमी होते. अमराठी लोकांनीही मराठी भाषा शिकून सन्मान केला पाहिजे.”

पुढे त्या म्हणाल्या, “तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून मारू. दुबे सारख्या लोकांना इथे येऊन काम करून मराठी माणसाचा अपमान करता येणार नाही. तुझ्या इथे येऊन मराठी माणूस तुला आपटू शकतो. दुबे कुत्र्यासारखा गुरफटून बोलतो. त्यांनी जर दिलगिरी व्यक्त केली नाही तर महाराष्ट्रात आल्यावर चपलेचा प्रसाद मिळेल.”

मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या वक्तव्यामुळे केवळ राजकीय वातावरण तापलं नाही, तर मराठी अस्मितेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकाराला ‘ठरवून केलेलं भडकावू राजकारण’ असल्याचा आरोप ठाकरेंच्या समर्थकांकडून केला जातोय.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now