राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाढ चव्हाट्यावर आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी – कॉंग्रेस, कॉंग्रेसमधील नेते मंडळी देखील एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभे राहिले आहेत.
याचबरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये शिंदे सरकार आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे पहिल्या पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस वादळी ठरले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या करुणा शर्मा प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली.मुख्यमंत्र्यांनी हा निशाणा साधताना धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा दिला. यावरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या रणरागिणी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे.
वाचा काय म्हंटलंय रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ट्विटमध्ये?
‘काय दिवस आलेत महाराष्ट्राला! मुख्यमंत्री साहेब.. आमदारांच्या संमतीच्या लफडे, अनौतिक संबंध यावर बोलतात. त्यांना यातून काय सिद्ध करायचं आहे, काय उद्दिष्ट्ये आहेत. व्यक्तिगत लफड्यात, अनैतिक संबंधात कोणता विकास साध्य करायचा आहे? ते तर सांगा, असा संतप्त सवाल रूपाली यांनी शिंदेंना केला आहे.
वाचा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना काय म्हंटलंय?
‘पावसाळी अधिवेशनामध्ये मुंडे ही किती ओरडत होते. ते एवढ्या जोरात ओरडत होते की, जसे मूळचे शिवसैनिक वाटत होते. तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, करुणा, दया दाखवली, त्यामुळं हे झालं, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणले की, मात्र, परत-परत प्रेम, करुणा, दया दाखवता येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला काल मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंना लगावला. यावरून आता राजकारण तापलं आहे. विधान सभेत बोलताना प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हवी अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या