Share

रुपाली पाटलांनी केले फडणवीसांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या, ‘ही’ राजकीय सुंदरता टिकवली पाहिजे

काल महान गायिका,भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर मुंबईतील त्यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना गोव्यातून मुंबई येण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्ट दिली. त्याची सर्वत्र चर्चा होत असताना, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र लतादीदींची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8:12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यानंतर, मुंबईतील त्यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी, अनेक दिग्गज व्यक्तींनी, सेलिब्रिटी, आणि राजकीय व्यक्तींनी अंत्यदर्शनासाठी आपली हजेरी लावली. यावेळी गोवा येथे प्रचारासाठी असणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना निधनाची बातमी समजताच त्या मुंबईत येण्यासाठी निघाल्या.

मात्र, पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती. यावेळी देवेंद्र फडणवीस हे गोवा निवडणुकीचे प्रभारी असल्यानं ते देखील प्रचारासाठी गोव्यात होते. ते त्यांच्या चार्टर प्लेनने मुंबईला रवाना होणार असल्याचे कळताच पेडणेकरांनी फडणवीसांसोबत संपर्क साधला.

त्यांनी फडणवीस यांना लिफ्ट देण्याची विनंती केली. त्यानंतर फडणवीसांनी विनंती मान्य करत गोव्यापासून मुंबईपर्यंत शिवसेनेच्या महापौरांना लिफ्ट दिली. देवेंद्र फडवणीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर प्लेनने गोव्यातून मुंबईला आले. त्यांच्यासोबत किशोरी पेडणेकर देखील याच विमानातून मुंबईत आल्या. त्यावर अनेक चर्चा होत असताना राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.

रुपाली पाटील यांनी ट्विट केले की,”अचनाक लता दीदी यांच्या निधनाची बातमी मिळाली, मात्र, मुंबईच्या महापौर किशोरीताईंना पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या चार्टर प्लेनंन त्यांना गोवा टू मुंबई लिफ्ट दिली. खरतर महाराष्ट्राची हि राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवली पाहिजे.” असे म्हणत सर्व राजकीय नेत्यांना उपदेश दिला.

राजकारण

Join WhatsApp

Join Now