Share

rupali bhosle : रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी; गंभीर आजारामुळे अभिनेत्री रुग्णालायत दाखल

rupali bhosle

rupali bhosle share post in hospital  | असे म्हणतात की एखादी छोटी जखम झाली असली तरी तिच्यावर वेळेत उपचार घ्यायला हवे, नाहीतर पुढे जाऊन ती खुप धोकादायक ठरु शकते. अनेकदा आपण आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण असे दुर्लक्ष करणे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला चांगलेच महागात पडले आहे.

आई कुठे काय करते? मालिका फेम रुपाली भोसले एका आजाराशी झुंज देत आहे. तिने इंस्टाग्राम पोस्ट करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री सध्या रुग्णालयात भरती झाली असून तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे.

२४ नोव्हेंबर रोजी मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले हिला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्रीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी आपल्या आजाराबद्दल एक पोस्ट लिहिली.

रुपाली भोसलेने एक पोस्ट करत म्हणाली की, आपल्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका. आपल्या आरोग्याला कधीच हलक्यात घेऊ नका. काहीही दुखत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका. तसेच तिच्यासोबत नक्की काय झालं हे सांगितलं आहे.

रुपाली भोसलेने म्हटले आहे की, दुसऱ्यांची काळजी घेण्यासोबतच स्वत:सोबत . झाड जितके निरोगी असेल तितके चांगले फळ देईल. #LifeIsBeautiful काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. आता मी बरी आहे. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार.

पुढे ती म्हणाली की, अनेक वेळा आपण आपल्या शरीरागोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आपण तोपर्यंत आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष करतो जोपर्यंत त्या मोठ्या होत नाही. कारण आपल्याला वाटते की ते महत्त्वाचे नाही. पण माझी एकच विनंती आहे की शरीराला काहीही त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांना दाखवा.

रुपालीने उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी डॉ रेखा ग्याथने यांचे आभार मानले. ती म्हणाली की, ‘जेव्हाही मला उपचारादरम्यान त्यांची गरज पडली, तेव्हा मी त्यांना लगेच फोन केला. त्यांनी मला सर्व प्रकारे मदत केली. मला डॉक्टरांना भेटून खुप समाधान भेटले. तसेच मला सुरक्षित वाटले.

दरम्यान, रुपाली भोसलेने तिच्या शस्त्रक्रियेबद्दल फारशी माहिती शेअर केलेली नाही. रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे करते’ या मराठी शोमध्ये संजनाची भूमिका साकारत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती लवकरच शूटिंगवर परतणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
Rohit Sharma : रोहित शर्मामुळे झाले ‘या’ स्टार खेळाडूचे करिअर उद्ध्वस्त? गंभीर आरोप करत म्हणाला…
गायीचं दूध व शेण विकून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला कमावतो तब्बल दीड कोटी; वाचा सांगोल्याच्या पठ्याची सक्सेस स्टोरी
Shikhar Dhawan : भारतीय संघाच्या पराभवाला शिखर धवनच जबाबदार? ‘त्या’ एका चुकीमुळे झाला लज्जास्पद पराभव

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now