शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असताना जेवढे एकनाथ शिंदे हे चर्चेत नव्हते. तेवढे आता राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारला असला तरी शिंदेंमधील माणुसकीचे दर्शन अनेकदा होताना पाहायला मिळत आहे.
असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. शिंदेंमधील माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यापासून शिंदे हे जातीने राज्यात लक्ष घालताना पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक भागात जावून मुख्यमंत्री शिंदे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहेत.
जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे हे धावत आहेत. असाच प्रकार नुकताच विलेपार्ले येथे बघायला मिळाला. एका तरुणाच्या कारने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. नेमकं त्याच रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जातं होता. मुख्यमंत्र्यांनी कोणताही मागचा – पुढचा विचार न करता आपली गाडी थांबवली.
तेव्हा प्रचंड पाऊस पडत होता. मात्र भर पावसात मुख्यमंत्री शिंदे संबंधित कारचालकाच्या मदतीसाठी तात्काळ धावले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, लाखोंच्या कारचे क्षणात नुकसान झाल्याचे पाहून तरुण रडत आहेत.
अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मात्र त्या तरुणाला आधार दिला आहे. तात्काळ मुख्यमंत्री शिंदे भरपावसात आपल्या गाडीतून खाली उतरले. मुख्यमंत्र्यांनी संबंधित तरुणाची विचारपूस केली. ‘गाडी आपण नवी घेऊ..,’ असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित तरुणाला दिले.
वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे..?
मुख्यमंत्र्यांनी संबंधित तरुणाला त्याचे नाव विचारले. यानंतर जीव वाचला हे महत्त्वाचे, गाडी आपण नवी घेऊ. काळजी करू नकोस, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी संबंधित तरुणाला धीर दिला. एवढ्यावरच मुख्यमंत्री थांबले नाही तर, जळत्या गाडीजवळ न जाण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा