समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबीना खानम त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येतात. अशात सध्या देशभरात ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरु आहे. आता त्यावरही त्यांनी एक विधान केलं आहे. ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे. (rubina khanam on Gyanvapi Mosque)
ज्ञानवापी मशिद नसून ते एक मंदिर आहे, असा दावा केला जात आहे. शासनकर्त्याने मंदिर तोडून मशिद बांधली होती, असेही म्हटले जात आहे. आता या प्रकरणावर रुबीना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शासनकर्त्याने मंदिर तोडून मशिद बांधली असा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे. जर त्यांचा हा दावा सिद्ध झाला तर मुस्लिम समाज, धर्मगुरु यांनी ती जमीन हिंदू पक्षाला परत दिली पाहिजे, असे वक्तव्य रूबीना खानम यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
कब्जा केलेली जमीन हिसकावून घेतलेली जमीन आणि बळाच्या जोरावर कब्जा केलेल्या जमिनीवर नमाज पडणं इस्लाममध्ये हराम मानलं जातं. हे मुस्लिम समाज आणि धर्मगुरुंनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे मंदिर असल्याचे सिद्ध झाले, तर जमीन हिंदू पक्षाला देण्यात यावी, असे रूबीना खानम यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी असे म्हटले आहे. तसेच दावा खरा निघल्यास ती जमीन हिंदुंना द्यावी. तसेच हा दावा खोटा असल्यास हिंदू पक्षाने शांततापूर्ण मार्गाने ही जमीन मुस्लिम समाजाला मशिदीसाठी देण्यात यावी असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, रुबीना खालम या बुरखा आणि लाऊस्पीकरच्या मुद्यावरुनही चर्चेत आल्या होत्या. जर कोणी आमच्या हिजाबवर हात टाकला तर आम्ही त्याचे हात तोडून टाकू, असे रुबीना म्हणाल्या होत्या. तसेच लाऊडस्पीकरवर बोलताना रुबीना म्हणाल्या की, मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला तर मंदिराबाहेर लाऊडस्पीकर लावून कुराणचे पठण करु.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: कंगना राणौतने ‘या’ व्यक्तीला भर पार्टीत केले वारंवार किस, व्हिडीओ पाहून चाहते अवाक
धक्कादायक! प्लास्टीक सर्जरीच्या नादात प्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला आपला जीव, फिल्म इंडस्ट्रीत शोककळा
बाळाची प्लॅनिंग करतोय 8 बायका असलेला ‘हा’ व्यक्ती, प्रथम जी येईल तिला देणार प्राधान्य