पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर इंधन दरवाढीने गगन झेप घेतली आहे. तर पेट्रोल डिझलेच्या किंमती महागल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्येही वाढ करण्यात आली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
मंगळवार पासून राज्यात नवीन दर लागू करण्यात आल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर आता ५० रुपयांनी महागला आहे. याअगोदर पेट्रोल डिझलेच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली होती. आता या जनतेला आणखीन एक फटका बसला आहे.
सरकारने नवीन दर लागू केल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ झाली आहे. त्यानुसार, पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा पार केला आहे. पटणात आता एलपीजी गॅसची किंमत 1039.50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 976 रुपयांवर सिलेंडरचे दर गेले आहेत.
महत्वाचे म्हणजे मुंबई भागात एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. तसेच चेन्नईत गॅस सिलेंडरची किंमत 965.50 रुपये झाली आहे. लखनऊमध्ये ही एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहेत. या वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांनी जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या वादामुळे पेट्रोल डिझलेच्या किंमती महागल्या आहेत. नुकतीच पेट्रोलमध्ये प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलमध्ये प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ झाली आहे. याकारणाने विरोधी पक्षनेते देखील केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
अशा स्थितीतच सिलेंडर महागल्यामुळे सर्वसामान्य लोकांवर चुली पेटवून स्वयपांक करण्याची वेळ आहे. जर या किंमती कमी झाल्या नाहीत तर जनतेच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. मागील काही दिवसांपासून भाज्या, धान्य, दुध आणि खाद्य तेलाचे दर खालीवर होताना दिसत आहेत. त्यामुळे जनतेचे आर्थिक गणित चांगलेच कोलमडले आहे.
महत्वाच्या बातम्या
१२६ वर्षांपासून निरोगी आयुष्य जगत आहेत स्वामी शिवानंद, वाचा काय आहे त्यांच्या दिर्घायुष्याचे रहस्य
सोनम कपूर होणार आई, पती आहुजासोबत पोस्ट करत म्हणाली, आम्ही तुझे स्वागत करण्यासाठी..
लिफ्ट घेण्यास नकार देणाऱ्या तरूणाचे अभिनेत्री रकूलप्रीतनेही केले कौतूक; म्हणाली…
तनुश्री दत्ताचे काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, मला कपडे काढून…