राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट ‘आरआरआरला’ पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर मोठा झटका बसला आहे. रिलीजच्या 11व्या दिवशी, या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या कलेक्शनमध्ये पहिल्यांदाच जबरदस्त घसरण झाली आहे. अचानक झालेली घसरण पाहून चर्चेला उधाण आलं आहे.
या चित्रपटाने सोमवारी हिंदीतून केवळ 7 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर याआधी वीकेंडमध्ये चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दुसऱ्या वीकेंडमध्ये एकूण 51.25 कोटींचा व्यवसाय केला. रविवारी या चित्रपटाने 20.75 कोटींची कमाई केली होती.
तर सोमवारी केवळ 7 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मात्र, 11 दिवसांत केवळ हिंदी व्हर्जनमधून चित्रपटाची एकूण कमाई 190 कोटींवर गेली आहे. तर जगभरातील चित्रपटाची एकूण कमाई 900 कोटीवर पोहोचली आहे. 4 एप्रिल 2022 मध्ये चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एका दिवसात 7 करोड कमावले.
ट्रेड अँनलिस्टना आशा होती की, मंगळवारी 5 एप्रिलला सिनेमा 200 करोडचा टप्पा पार करेल. पण आता ज्या पद्धतीनं सिनेमाच्या हिंदी व्हर्जनच्या बॉक्सऑफिस कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळत आहे, त्यावरनं आणखी काही दिवस 200 करोडपर्यंत मजल मारायला लागतील असं बोललं जात आहे.
RRR सिनेमा 200 करोड पार करु शकला तर तो ‘द काश्मिर फाईल्स’ची बरोबरी करु शकेल. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमानं ओपनिंगला 3.55 करोड कमावले होते आणि 13 व्या दिवशी ‘द काश्मिर फाईल्स’नं 200 करोडची कमाई करीत एक नवा इतिहास रचला होता.
ट्रेड अँनलिस्टच्या अभ्यासानुसार, RRR ने जगभरात 900 करोडचा टप्पा पार केला आहे, ज्यामध्ये सिनेमाच्या तेलगु आणि हिंदी सहित सगळ्याच भाषांच्या कलेक्शनचा समावेश आहे. आता हा सिनेमा जगभरात 1000करोड कमावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र अचानक होणारी जवळपास 40 टक्के घसरण पाहता शंका उपस्थित केली जात आहे.