बाहुबली फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा बहुप्रतीक्षित आरआरआर हा चित्रपट ७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, देशात वाढत्या कोरोनाच्या रूग्णसंख्येमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली (RRR Release Date Announced)आहे. आरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
‘आरआरआर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. ‘आरआरआर”च्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिण्यात आले की, ‘आरआरआर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख फायनल झाली आहे. २५ मार्च २०२२ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार.
#RRRonMarch25th, 2022… FINALISED! 🔥🌊 #RRRMovie pic.twitter.com/hQfrB9jrjS
— RRR Movie (@RRRMovie) January 31, 2022
राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘आरआरआर’ चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट कोमरम भीम आणि अल्लूरी रामराजू या दोन क्रांतिकारकांवर आधारित आहे. या दोन क्रांतिकारकांनी ब्रिटीश राजवट आणि हैदराबाद निजामविरोधात लढा दिला होता.
ज्यूनियर एनटीआर या चित्रपटात कोमरम भीम यांच्या भूमिकेत तर रामचरण अल्लूरी सीतारामराजू यांच्या भूमिकेत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात अल्लूरी रामराजू यांची पत्नी अल्लूरी सीता रामराजू यांची भूमिका साकारत आहे. या तिघांशिवाय चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगन, समुथिरकानी, ओलिविया मॉरिस, एलिसन डूडी, रे स्टीवेन्सन आणि श्रिया सरनही मुख्य भूमिकेत आहेत.
तेलुगूसोबत हा चित्रपट तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. डीवीवी एंटरटेनमेंट्सद्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असलेल्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत. हा एक मेगा बजेट चित्रपट असून चित्रपट बाहुबली चित्रपटाचे रेकॉर्ड तोडेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.
एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटाचे नॉर्थ इंडियन राईट्स १४० कोटी रूपयांना विकले गेले. या डीलसोबत चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ८९० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
रानू मंडल पुन्हा आली भेटीला, गायलं कच्चा बादाम गाणं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ
सलमान अफजल तर मी छत्रपती शिवाजी महाराज, कोथळा बाहेर काढेन; बिचुकलेचे वादग्रस्त वक्तव्य
बिचुकलेने सलमानला दिली आता थेट धमकी; म्हणाला, सलमान अफजल खान तर मी..