Share

RRR चे डायरेक्टर एस एस राजामौलींवर संतापली आलिया भट्ट? डिलीट केल्या चित्रपटाशी संबंधित पोस्ट

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत तर अजय देवगण आणि आलिया भट्ट महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटातील ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खूप खूश आहेत आणि दोघांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.(rrr-director-ss-rajamouli-angry-with-alia-bhatt-posts-related-to-deleted-movie)

त्याचबरोबर अजय देवगणची दमदार व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आलिया भट्ट(Alia Bhatt)च्या स्क्रीन प्रेझेन्सलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण चित्रपटात मिळालेल्या स्क्रीन स्पेसबद्दल आलिया नाराज आहे का? अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की आलिया भट्ट ‘RRR’चे डायरेक्टर एसएस राजामौली(SS Rajamouli) यांच्यावर नाराज आहे.

आलियाला चित्रपटात मिळालेली कमी स्क्रीन स्पेस हे त्याचे कारण असल्याचे मानले जात आहे. ‘आरआरआर’मधील तिचे छोटे पात्र पाहून आलिया नाराज आहे. त्यामुळे रागाच्या भरात तिने आपल्या सोशल मीडिया(Social media) अकाऊंटवरून ‘RRR’शी संबंधित पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, आलिया भट्टने एसएस राजामौली यांना अनफॉलो केले आहे. मात्र, यात तथ्य नाही. आलिया अजूनही राजामौलींना फॉलो करत आहे. जर तुम्ही आलियाची फॉलोइंग लिस्ट पाहिली तर तुम्हाला त्यात राजामौली यांचे नाव दिसेल. पण हे खरे आहे की आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून RRR शी संबंधित पोस्ट डिलीट केल्या आहेत.

याबद्दल फक्त आलिया भट्ट अधिकृतपणे खुलासा करू शकते. आलियाला आरआरआरमध्ये खूप कमी स्क्रीन स्पेस मिळाली आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत आहे आणि या पात्रात ती प्रेक्षकांवर फारसा प्रभाव टाकू शकली नाही. राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि अजय देवगण यांनी चित्रपटातील सर्वोत्तम कामगिरीचे श्रेय घेतले आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now