Share

दसरा मेळावा कोणाचा शिंदे गट की ठाकरे गट? आठवलेंनी केला मोठा गौप्यस्फोट, सांगितलं ‘कारण’

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेवर आपला दावा सांगत आहेत.  पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्हसुद्धा आपलेच असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येतं आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कुणाची, याबाबत सुप्रीम कोर्टात सध्या वाद सुरु आहे.

तसेच दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. मात्र, आता शिवसेनेचे दोन गट पडल्याने यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत दोन्ही गटाकडून आम्हीच दसरा मेळावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्यावरून राजकारण देखील रंगलं आहे. सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात दावे – प्रतिदावे सुरू आहेत. या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे.

काल कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खासगी कामानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले  हे आले होते. यावेळी आठवले यांनी शिवतीर्थावरील ( शिवाजीपार्क ) दसरा मेळाव्याच्या वादावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली.

आठवले यांनी म्हंटलं आहे की, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. तर उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही,’ असा सल्ला देखील आठवले यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

दरम्यान, पुढे बोलताना रामदास आठवले यांनी म्हंटलं आहे की, ‘रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत आहे. शिंदेंचा गट हा भाजप सोबत आलेला आहे. मागच्या निवडणुकीत मुंबईत भाजप आणि आरपीआय एकत्र असताना 82 जागा निवडून आणल्या होत्या. यावेळी 114 जागा निवडून येण्यात काही अडचण येणार नसल्याचं आठवले यांनी सांगितलं.

 

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेसाठी लाचारी! उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून सेनेची ‘ही’ रणरागिणी जाणार शिंदे गटात
अंधेरी विधानसभेसाठी थेट मातोश्रीवरून सूत्र हलली, ‘या’ उमेदवाराला उतरवलं मैदानात, विरोधकांना फुटला घाम
MNS : राज्य हादरले! मनसेच्या बड्या नेत्याला चाकूने भोसकून ठार मारले; हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल
“मी मुर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, मी पिएचडी होल्डर आहे, आणि…,” हाफकिन प्रकरणावरून तानाजी सावंत संतापले

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now