Share

रोहित विराटलाही टाकले मागे ! ‘हा’ भारतीय खेळाडू कमावतो सर्वाधिक पैसे; नाव वाचून धक्का बसेल

मुंबई  | काही दिवसातच आता आयपीएलचा १५ वा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधीच आयपीएलचा क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनौ सुपर जायट्ंस, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स या टीमचा समावेश असणार आहे. तसेच, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा यांसारखे स्टार खेळाडू या टीमचे कर्णधार असणार आहेत.

तुम्हाला माहित आहे का? आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत अशी क्रिकेट टी-२० लीग आहे. या स्पर्धेतील खेळाडूंनाकोट्यावधी रुपयांमध्ये मानधन दिले जाते. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला करोडपती होण्यास वेळ लागत नाही. मात्र या खेळाडूंना आयपीएलमध्ये किती मानधन दिले जाते हे तुम्हाला माहित आहे का?

कारण यावेळी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू लखनौ सुपर जायट्ंस संघाचा कर्णधार केएल राहुल असल्याचे समोर आले आहे. कारण राहुलला यावेळी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तब्बल १७ कोटी दिले जाणार आहेत. तब्बल १७ कोटींची कमाई करत राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्माला देखील मागे टाकले आहे.

आयपीएलमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंना १६-१७ कोटी इतके मानधन मिळते. पण भारतातील असा एक खेळाडू आहे जो फक्त सात दिवसात १६.७ कोटी रुपये कमावतो. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय गोल्फपटू अनिर्बान लाहिरी आहे. विराट कोहली, रोहित शर्मा वर्षभरात जितकी कमाई करतात तितकी कमाई अनिर्बान लाहिरी सात दिवसात करतो.

दरम्यान, अनिर्बन लाहिरीने प्लेयर्स चॅम्पियनशिप स्पर्धेत धडाडीची कामगिरी केली होती. मात्र, विनर ट्रॉफीच्या इतक्या जवळ येवून त्याला पराभव पत्कारावा लागला. पराभव झाला तरी लाहिरीने पुन्हा एकदा जोमाने कम बॅक करत २१ लाख ८० हजार डॉलरची सर्वोत्तम कमाई केली. त्याच्या या एन्ट्रीने त्याने भारतीय गोल्फ विश्वात आपला एक वेगळाच इतिहास घडवला.

प्लेयर्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पराभवानंतर लाहिरीने आपल्या भावना व्यक्त केल्या, म्हणाला की, मी गेल्या सात वर्षापासून खेळत आहे, मात्र कधी विजेतेपद मिळवता आले नाही. किंवा तिथपर्यंत मी कधी पोहचू शकलो नाही. पण आज मला जिंकायचे होते. कारण आज माझ्याकडे विजेतेपद जिंकण्याची चांगली संधी होती. लहिरीचा पराभव झाला असला तरीही मिळालेल्या माहितीनुसार, अनिर्बन लाहिरी हा सात दिवसात सर्वाधिक पैसे कमवणारा भारतीय खेळाडू बनला आहे.

महत्वाच्या बातम्या:
”काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती, त्यावेळी बाकीचे अतिरेक्यांच्या भीतीने गप्प होते”
आनंदाची बातमी! लवकरात लवकर जन धन खाते उघडा आणि मिळवा दर महिन्याला तीन हजार रुपये
कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते
मन उडू उडू मालिकेतून ‘हा’ कलाकार होणार एक्झिट; वेगळेच कारण आले समोर

 

इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now