बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आणि निर्माते आहेत ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आहे. मात्र या सर्वांमध्ये अँक्शन चित्रपटासाठी ओळखला जातो तो म्हणजे रोहित शेट्टी. रोहित शेट्टी हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहे. रोहित शेट्टीने अनेक अँक्शन चित्रपट केले आहे. हे चित्रपट चाहत्यांना देखील खूप आवडतात.
चित्रपटासह रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी’ या शोचा होस्ट देखील आहे. तसेच नुकताच तो सोनी टीव्हीवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचा परीक्षक म्हणून आला आहे. सध्या या शो दरम्यानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या एपिसोडमध्ये त्याने खूप धमाल केली आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये एक खास गोष्ट घडली की, ती म्हणजे शोमधील दोन स्पर्धकांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली आहे.
त्याचबरोबर रोहित शेट्टीने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमधील स्पर्धक दिव्यांश आणि मनुराज या दोघांना चित्रपटात काम करायची संधी मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सर्कस’ असे आहे. या चित्रपटाचे शीर्षक गीत बादशाह लिहीत आहे. त्याच्यासोबत या दोन स्पर्धकांना काम करण्यासाठी साइन केले आहे. या शोमध्ये तो खास पाहुणा म्हणून आला आहे.
खरंतर या दोन्ही स्पर्धकांनी ‘ये मेरा दिल यार का दिवाना’, ‘गोलमाल’ आणि ‘आंख मारे’ या गाण्यांवर परफॉर्मन्स केला होता. दिव्यांश आणि मनुराजचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर फक्त रोहित शेट्टीच नाही तर परीक्षक किरण खेरही खूप आवडला. तसेच या दोघांच्या परफॉर्मन्सवर सर्वांनीच या दोघांचे कौतुक केले. तर किरण खेरने आपले मत व्यक्त करून परफॉर्मन्सप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
किरण खेर म्हणाली की, “तुम्ही इतका चांगला परफॉर्मन्स केला की, मला दोन मिनिटांनीच गोल्डन बजर द्यायचा होता! मला उठून नाचायचे होते. मला मंचावर येऊन तुमच्यासोबत रॉक करायचे होते! हा परफॉर्मन्स खूप छान झाला.” तसेच शिल्पा शेट्टीने देखील या दोघांचे कौतुक केले. ती म्हणाली की, “ही एक जादूची टीम आहे.”