Share

बॉलिवूड विरुद्ध साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या वादात रोहित शेट्टीची उडी; म्हणाला, बॉलिवूड संपणार…

काही काळापासून, हिंदी चित्रपट बॉक्सऑफिसवर वाईटरीत्या फ्लॉप होत आहेत, तर दक्षिणेकडील चित्रपट केवळ संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात जोरदार कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत आता बॉलिवूड चित्रपटांचे युग संपल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. साऊथ विरुद्ध बॉलिवूडच्या या वादात अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. यात आता चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने देखील उडी घेतली आहे.

रोहित शेट्टी नुकताच एका प्रमोशनला रणवीर सिंगसोबत गेला होता. यावेळी रोहितला साऊथच्या चित्रपटांचा बॉलीवूडवर काय परिणाम होतो याबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना रोहित शेट्टी म्हणाला, ज्यांना वाटतं की बॉलीवूड संपलं आहे, त्यांना एक प्रकारचा आनंद मिळतो.

तसेच पुढे म्हणाला, ज्यांना वाटते बॉलिवूड संपणार आहे, तर त्यांना सांगतो की बॉलिवूड कधीच संपणार नाही. त्याच्या या उत्तराचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्याने अनेक उदाहरणे दिली, ज्यावरून बॉलीवूड आणि साऊथची इंडस्ट्री एकमेकांशी संबंधित असल्याचे दिसून येते.

म्हणाला, तुम्ही जेव्हा इतिहास बघाल तर ५० आणि ६० च्या दशकात ‘प्यार किए जा’ आला होता जो रिमेक होता, यात शशी कपूर होते .त्याच्यानंतर ८० च्या दशकात अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना सुपरस्टार होते. त्यानंतर ‘एक दुजे के लिए’ मध्ये एक नवीन मुलगा आला, जो की कमल हसन होते जे हिट झाले.

आपल्याकडे दक्षिणेतील ८० आणि ९० च्या दशकातील जया प्रदा आणि श्रीदेवी या सुपरस्टार होत्या. हिम्मतवालापासून जस्टिस चौधरीपर्यंत ते सगळे दाक्षिणात्य चित्रपट होते. आमच्या फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ए आर रहमान देखील दक्षिणेतील आहेत.

८० च्या दशकात जेव्हा व्हीसीआर आले तेव्हा लोक म्हणाले की बॉलीवूड आणि थिएटर संपेल. OTT आल्यावर लोक म्हणाले की आता बॉलीवूड संपेल. ‘बॉलीवूड संपले’ ऐकून त्यांना एक नशा आणि आनंद होतो, पण बॉलिवूड कधीच संपणार नाही. असा रोहित म्हणाला.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now