पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने तुफान फटकेबाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजाने टाकलेल्या एका चेंडूवर रोहित शर्माने(Rohit Sharma) पूल शॉट मारला. हा चेंडू थेट सीमारेषेबाहेर गेला आणि स्टेडियममध्ये बसलेल्या एका लहान मुलीला लागला.(Rohit Sharma’s six hit and injured, then hitman gave her a special gift ‘Hey’)
यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेव्हिड व्हिलीने टाकलेल्या एका चेंडूवर रोहित शर्माने षटकार ठोकला. यावेळी चेंडू स्टेडियममध्ये बसलेल्या एका मुलीला लागला. या घटनेनंतर कॅमेऱ्यावर चेंडू लागलेल्या मुलीला दाखवण्यात आलं.
https://twitter.com/hitman450708/status/1546875398822461440?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1546875398822461440%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fkrida%2Frohit-sharma-meet-the-injured-little-girl-gift-her-chocolate-rohit-sharma-six-hit-girl-fan-injured-eng-vs-ind-kgm00
या लहान मुलीला चेंडू खूप जोरात लागला होता. त्यामुळे फिजीओने तात्काळ या मुलीच्या उपचारासाठी धाव घेतली. यावेळी सामना काही काळ थांबवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सामना सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्या मुलीची भेट घेतली. तसेच त्या मुलीला एक चॉकलेट देखील गिफ्ट म्हणून दिले.
https://twitter.com/ChapsSadak/status/1547043732012384258?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1547043732012384258%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fkrida%2Frohit-sharma-meet-the-injured-little-girl-gift-her-chocolate-rohit-sharma-six-hit-girl-fan-injured-eng-vs-ind-kgm00
फिजीओने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीची तब्येत सध्या नीट आहे. सोशल मीडियावर अनेकांनी रोहित शर्माचे कौतुक केले आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने झंझावाती खेळी केली. रोहित शर्माने या सामन्यात ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली.
इंग्लंडने केवळ १११ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. भारतीय संघाने एकही विकेट न गमावता १११ धावांचे लक्ष्य पार केले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराहने या सामन्यात इंग्लंडचे सहा गडी बाद केले. यासाठी जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :-
मातोश्रीबाहेर मृत्यू झालेल्या शिवसैनिकासाठी एकनाथ शिंदे आले धावून, केली मोठी मदत
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे धनुष्यबाणालाच विसरले, पोस्टर झाला व्हायरल
अदानी समुहाच्या मुंद्रा बंदरावर पोलिसांची कारवाई, छापेमारीत सापडलं तब्बल ३७५ कोटींचे हेरॉइन